यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलीत कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा या उद्देशाने ‘ स्री पुरुष समानता स्रीचे शिक्षण,ह्या विषयावर प्राचार्य.डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच पोस्टर स्पर्धा घेण्यात आली होती.
या स्पर्धत महाविद्यालयातील एकुण सहा विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता.या स्पर्धचा निकाल महाविद्यालयाच्या वतीने जाहीर करण्यात आला असुन यामध्ये तृतीय वर्ष विज्ञान शाखेची विद्यार्थीनी फरीदा तडवी हिने प्रथम क्रमांक मिळविला तर द्वितीय वर्ष विज्ञान शाखेची विद्यार्थिनी चारुलता पाटील हिने द्वितीय क्रमांक पटकावला आहे.संपुर्ण स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य प्रा.अर्जुन पाटील व विद्यार्थी विकास विभाग प्रमुख प्रा.डॉ.एस.पी.कापडे यांनी परिश्रम घेतले.यावेळी प्रा.डॉ.वैशाली कोष्टी,प्रा.डॉ.संतोष जाधव,प्रा.सुभाष कामडी,प्रा.गणेश जाधव,प्रा.मिलींद मोरे यांनी विशेष सहकार्य केले.