Just another WordPress site

“…माणसाने माणसाशी माणसासम वागणे”या शिकवणीप्रमाणे यावलकरांनी घडविले माणुसकीचे दर्शन

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-

“हिच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे वागणे,माणसाने माणसाशी माणसासम वागणे”या गीतातील भावार्थानुसार संकटात प्रत्यकाने जाती मतभेद विसरून मदतीचा हात पुढे केला पाहिजे अशीच माणुसकीचे दर्शन घडविणारी व अखिल मानवजातीला महत्वपूर्ण अशी शिकवण देणारी घटना यावल शहरात नुकतीच पाहायला मिळाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,गुवाहाटी आसाम मधील शर्मा नामक एक कुटुंब त्यात एक ६५ वर्षीय वयोवृद्ध व्यक्ती त्यांची धर्मपत्नी व  त्यांची मुलगी हे उज्जैन(मध्य प्रदेश) येथून महाकालचे दर्शन घेऊन शिर्डीला साईबाबाचे दर्शन घेण्याकरिता जात असतांना बऱ्हाणपूर वरून यावल येणाऱ्या बसच्या प्रवासादरम्यान त्यांची पैशांची पर्स,एटीएम व मोबाईल चोरीला गेला हि बाब त्यांना यावल येथे उतरल्यानंतर लक्षात आली असता सदरील कुटुंब फारच हताश झाले.शर्मा कुटुंब हे प्रोफेशनल व एज्युकेटेड असल्याचे दिसुन येत होते.बसमध्ये त्यांच्या कडील सर्व काही चोरीस गेल्यामुळे काय करावे ते कळत नव्हते त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारे एटीएम किंवा शिल्लक पैसे नसल्यामुळे कोणाला मदत मागायची ते विचारात पडले.यावेळी त्या वयस्क वृद्धाने त्यांच्या हातातील महागडे मनगटी घड्याळ विकायचे ठरविले व सदरील कुटुंब हे पैशांची तजवीज करण्याकरिता घड्याळ कोण घेईल का?या शोधात असतांना यावल शहरातील नगीना मस्जिद परिसरात असलेल्या मोहसीन भाई यांनी त्यांना विचारले असता त्या कुटुंबाने घडलेला प्रकार त्यांना सांगितला.त्यावेळी अनेकांच्या मनात आपुलकी निर्माण झाली असता तिथल्या नागरिकांनी त्यांना एस एच खान बँड चौकात त्यांना बसविल्यानंतर शर्मा नावाच्या व्यक्तीने घडलेली घटना सांगितली.यावेळी मनसेचे कार्यकर्ते कुणाल बारी यांनी मनसे जिल्हाध्यक्ष चेतन आढळकर यांना फोन लावून बोलावून घेतले त्याठीकाणी चेतन अढळकर यांनी त्यांची सर्व सत्य परिस्थिती जाणून घेतली आणि स्वतः एक हजार रुपये देऊन मदतीचा हात पुढे केला.त्याचबरोबर यावल येथील सामाजीक कार्यकर्ते डॉ.कुंदन फेगडे,माजी प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते,दुध व्यवसायाचे व्यापारी सचिन मिस्त्री,प्रमोद बारी,गणेश येवले,अजय तायडे,शुभम वाणी या महोदयांनी देखील आपआपल्या परीने योगदान देऊन पाच हजार रुपये जमा करून शर्मा कुटुंबाला मदतीचा हात दिला तसेच एव्हडेच नव्हे तर स्वतः यावल येथून रिक्षा करून दिली व भुसावळ रेल्वे स्टेशन वरती त्यांना त्यांच्या घरी जाण्याच्या प्रवासासाठी रवाना केले.त्यामुळे “हिच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे वागणे,माणसाने माणसाशी माणसासम वागणे”या गीतातील भावार्थातील शिकवणीनुसार यावल येथील या महोदयांनी माणुसकीचे दर्शन घडून समाजापुढे एक नवा आदर्श उभा केला आहे.अशा संकट समयी मदत करणाऱ्या सर्व दानशूर व्यक्तीचे चेतन अढळकर यांनी आभार मानले आहे.तर माणुसकीच्या नात्याने अशा लोकांना मदत करणे हे आपले कर्म आणि धर्म असून यावलकरांनी केलेली संकटातील मदत पाहुन गुवहाटीचे शर्मा कुंटुब भारावले व त्यांनी मदतीसाठी समोर आलेल्या सर्वांचे आभार मानले.या सेवाभावी कार्याचे तालुक्यात सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.