जळगाव-पोलिसनायक(प्रतिनिधी):- मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना पदावरून हटविल्यानंतर त्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई बाबत विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.किरणकुमार बकाले यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या निरीक्षक पदावरून हटविण्यात आल्यानंतर त्यांच्या पदाचा अतिरिक्त कारभार पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यांनतर मराठा समाजात तीव्र संतापाची लाट निर्माण झाली.या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांनी बकाले विरुद्ध कठोर कारवाई करण्यासंदर्भात विशेष पोलीस महानिरीक्षक यांना प्रस्ताव पाठविला होता.त्याशिवाय बकाले यांची खाते अंतर्गत चौकशीही सुरु करण्यात आली आहे.परिणामी बकाले यांच्यावर निलंबनाची कारवाई बाबत विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांनी याबाबतचे आदेश काढले आहे.दरम्यान बकाले यांना निलंबित केल्यानंतर यापदाची जबाबदारी कुणाकडे जाणार याबाबत जिल्हाभरात उत्सुकता लागून होती.या पार्श्वभूमीवर किरण बकाले यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या निरीक्षक पदावरून हटविण्यात आल्यानंतर त्यांच्या पदाचा अतिरिक्त कारभार पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे असा आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांनी काढला आहे.