Just another WordPress site

आयपीपीआयए तर्फे महावितरणला सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीचा पुरस्कार जाहीर

या यशाबद्दल अधिकारी व कर्मचाऱ्यांचे महावितरण अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी केले अभिनंदन

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा):-
इंडिपेंडंट पॉवर प्रोड्युसर्स असोसिएशन ऑफ इंडिया (आयपीपीआयए) या वीज क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेचा देशातील सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीचा पुरस्कार महावितरणला नुकताच देण्यात आला असून त्याचबरोबर ग्राहक जागृती,माहिती तंत्रज्ञानाचा कल्पक वापर व विजेच्या मीटरसाठी आधुनिक रेडिओ फ्रिक्वेन्सी तंत्रज्ञानाचा वापर केल्याबद्दल अन्य पुरस्कार देखील देण्यात आलेले आहेत.याबाबत महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी या यशाबद्दल अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.महावितरणचे अधीक्षक अभियंता निखिल मेश्राम यांनी बेळगाव येथे एका समारंभात हा पुरस्कार कंपनीच्या वतीने नुकताच स्वीकारला आहे.
यावेळी व्यासपीठावर केंद्रीय विद्युत प्राधिकरणाचे अध्यक्ष घनश्याम प्रसाद,केंद्रीय विद्युत नियामक आयोगाचे माजी अध्यक्ष प्रमोद देव, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाचे माजी अध्यक्ष व्ही.पी.राजा,आयपीपीएआयचे संचालक हॅरी धौल,हरयाणा विद्युत नियामक आयोगाचे माजी अध्यक्ष आर.एन.प्रशेर आणि इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीचे माजी संचालक चिंतन शाह उपस्थित होते.महावितरणची सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनी म्हणून निवड करताना वीज ग्राहक संख्या,विजेची विक्री,विजेची उत्तम उपलब्धता,बिल वसुलीची कामगिरी, वितरण हानी,अपारंपरिक ऊर्जा वापर व स्मार्ट मीटरचा वापर अशा अनेक बाबींचा विचार करण्यात आला.महावितरणला ग्राहकांमध्ये जागृती निर्माण करणारी सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनी म्हणूनही पुरस्कार मिळाला आहे त्याचबरोबर महावितरण कंपनीला ‘इनोव्हेटीव्ह आयटी ॲप्लिकेशन्स इन पॉवर सेक्टर’ या गटातही पुरस्कार देण्यात आला आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.