यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील दैनिक सामनाचे प्रतिनिधी तेजस यावलकर यांचे वडील तसेच श्री व्यास धनवर्षा सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा श्री बालसंस्कार विद्या मंदिर यावलचे उपाध्यक्ष डॉ.सतीश सुपडू यावलकर यांचे आज सकाळी सात वाजता ह्दयविकाराच्या तिव्र झटक्याने दुःखद निधन झाले ते ७० वर्ष वयाचे होते.डॉ.सतीश यावलकर यांच्या निधनामुळे आरोग्य व सहकार क्षेत्रातला निखळत्या ताऱ्याचा अस्त झाला असल्याची प्रतिक्रिया विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून व्यक्त केल्या जात आहे.
त्यांच्या मृत्यु पश्चात पत्नी,मुलगा,मुलगी,सुन,जावाई,नांतवडे असा मोठा परिवार आहे.डॉ.सतिष यावलकर यांची अंतयात्रा उद्या दिनांक १३ एप्रील गुरुवार रोजी त्यांचे वाणी गल्लीतुन राहते घरापासून सकाळी १० वाजता निघणार आहे.