Just another WordPress site

यावलचा आठवडे बाजार डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्ताने शुक्रवार ऐवजी शनिवारी भरणार

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-

येथील शुक्रवारच्या दिवशी भरणारा आठवडे बाजार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभुमीवर सदरील बाजार शुक्रवार ऐवजी शनिवार दि.१५ एप्रिल रोजी भरणार असुन या विषयाची बाजारात विकणाऱ्या व्यापारी व शेतकरी बंधू यांनी नोंद घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे.

महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिल रोजी संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते त्याअनुषंगाने यावल शहरात देखील डॉ.बाबासाहेबांची जयंती मिरवणुक शहरातील आठवडे बाजार परिसर पंचशिल नगर व बोरावल गेट जवळील आंबेडकर नगर अशा दोन भागातुन मिरवणुक काढण्यात येते.त्यापैकी शहरातील आठवडे बाजार हा मिरवणुक काढण्यात येणारा  परिसर राज्य महामार्गाला लागुन असल्याने त्या ठीकाणी बाजाराची खुप गर्दी होत असते.तसेच या भागातुन निघणारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुक आठवडे बाजार परिसरातुन निघुन शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करून पुन्हा आठवडे बाजार  परिसरातील पंचशिल नगर येथे मिरवणुकीचे विसर्जन करण्यात येते.त्यामुळे दि.१४ एप्रील शुक्रवार रोजी भरणारा आठवडे बाजार १५ एप्रील शनिवार रोजी भरवण्यात येणार आहे याची तमाम व्यापारी बंधू व नागरीकांनी नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी अमन मित्तल,प्रांत आधिकारी कैलास कडलग,उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.यानिमित्त मिरवणुक निघण्याचे स्थळ तसेच जाण्याच्या संपुर्ण मार्गाची पाहणी हि उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर व पोलीस प्रशासनाच्या वतीने नुकतीच करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.