Just another WordPress site

शिवसेना ठाकरे गटाच्या दोन बड्या नेत्यांचा अपघातात मृत्यू

मुंबई-पोलीस नायक (प्रतिनिधी):-

शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या दोन मोठ्या नेत्यांचा गाडी अपघातात नुकताच मृत्यू झाला आहे.नागपूर येथे १६ एप्रिल २३ रोजी महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार असल्याने या सभेसाठी हे नेते जात असताना हा अपघात झाला आहे.शिवसेनेच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे यांनी याबाबत ही माहिती दिली आहे.महाविकास आघाडीच्या नागपूर येथील वज्रमूठ या सभेसाठी जाताना अमरावती जवळ दहिसर विधानसभा उपविधानसभा समन्वयक अतुल तावडे व राजू शिंदे या दोन्ही नेत्यांचे अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली असे ट्विट करत शितल म्हात्रे यांनी शोक व्यक्त केला आहे.

मुंबईहून नागपूरला जात असतांना हा अपघात समृद्धी महामार्गावर झाला आहे यात २ जणांचा जागीच मृत्यू झाला असून काहीजण गंभीर जखमी असल्याचा प्राथमिक अंदाज सूत्रांकडून वर्तविला जात आहे.दरम्यान या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेऊन तात्काळ दखल घेतली असून डॉक्टरांशी संपर्क साधून जखमी कार्यकर्त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे तसेच या सर्व जखमी कार्यकर्त्यांवर तातडीने उपचार करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.