यावल -पोलीस नायक (तालुका प्रतिनिधी) :- तालुक्यातील चितोडा येथील रहिवाशी मनोज भंगाळे या तरुणाचा आज पहाटेच्या सुमारास अतिशय क्रुर पद्धतीने खुन झाल्याचे आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,यावल तालुक्यातील सांगवी फाटा ते डोंगर कठोरा रस्त्यालगत आज पहाटेच्या सुमारास चितोड येथील रहिवाशी मनोज संतोष भंगाळे (वय ४०)या तरुणाचा अतिशय छिन्नविछिन्न अवस्थेमध्ये मृतदेह आढळून आला.चितोडा ग्रामस्थांनी याबाबतची माहिती दिल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.यात मृत तरुण हा चितोडा येथील रहिवाशी असून त्याचे नाव मनोज संतोष भंगाळे असल्याचे निष्पन्न झाले.मनोज भंगाळे याचा खुन करतांना मारेकऱ्यांनी अतिशय क्रुर पद्धतीने त्याच्या गळ्यात फास टाकुन कोणत्या तरी अज्ञात वाहनाने त्यांना फरफटत ओढत आणून रस्त्याच्या लगत असलेल्या शेतात सदरील तरुणाचा मृतदेह टाकण्यात आला होता.या तरुणाच्या अंगावर तिक्ष्ण हत्याराने अनेक ठिकाणी वर करण्यात आले आहे.सदरील तरुण हा शेती व प्लॉट खरेदी विक्रीचा व्यवसाय करीत होता.
सदरील घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राकेश मानेगावकर,पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह भेट देऊन पंचनामा केला असता या तरुणाचा खून झाला असल्याचे निष्पन्न झाले.या खुनाचा तपासाची चक्रे फिरवायला पोलिसांनी लागलीच सुरुवात केली आहे.लवकरच या खुनातील मारेकऱ्यांचा तपास लावून मारेकऱ्यांना शोधून काढू असा विश्वास पोलीस निरीक्षक राकेश मानेगावकर यांनी व्यक्त केला आहे.