Just another WordPress site

यावल येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती उत्साहात साजरी

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-

येथील सिद्धार्थनगर व पंचाशिल नगर तरुण युवक मंडळाच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती आठवडे बाजार परिसरातुन रावेर यावल विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते डॉ बाबासाहेबांच्या प्रतिमेस अभिवादन व पुजनानंतर मोठया उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली.

यावल येथे दिनांक १४ एप्रील शुक्रवार रोजी यावल शहरातील आठवडे बाजार परिसरातील पंचशीलनगर व सिध्दार्थनगर ठिकाणाहून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मिरवणुक रावेर यावल विधानसभा मतदार संघाचे आमदार शिरीष चौधरी,काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रभाकर सोनवणे,पंचायत समिती माजी गटनेते शेखर पाटील,माजी नगरसेवक गुलाम रसुल,भाजपाचे तालुका अध्यक्ष उमेश फेगडे,अक्षय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे,माजी नगरसेवक मनोहर सोनवणे,कदीर खान,अनिल जंजाळे, युवराज सोनवणे,सागर गजरे,अशोक बोरकर,भिमराव वाघ,विक्की गजरे,नईम शेख यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आकर्षक बग्गीवरून काढण्यात आलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा मिरवणुकीत सहभाग घेतला.सदरील मिरवणूक शहरातील बुरुज चौक, खिर्निपुरा नगिना मस्जिद,जुने भाजी बाजार बारी वाडा चौक,काजीपुरा मस्जीद,बोरावल गेट आंबेडकर नगर अशा मार्गाने मिरवणुक काढण्यात आलेल्या मिरवणुकीची सांगता पुनश्च पंचशील नगर सिद्धार्थनगर आठवडे बाजार परिसरात झाली.यावेळी मिरवणुकीत संगीताच्या सुमधुर तालावर तरूणाई बेधुंद होवुन नाचत होती.यावेळी फैजपुर विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर,पोलीस उपनिरिक्षक अविनाश दहिफळे,पोलीस उपनिरिक्षक सुनिता कोळपकर, पोलीस उपनिरिक्षक सुनिल मोरे,वरीष्ठ सहाय्यक फौजदार अजिज शेख,सहाय्यक फौजदार नितिन चव्हाण,सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे,सहाय्यक फौजदार असलम खान,सहाय्यक फौजदार मुजफ्फर पठान व त्यांच्या सर्व सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त चोख ठेवला.

Leave A Reply

Your email address will not be published.