Just another WordPress site

महाराष्ट्रात राहणाऱ्यांनी मराठी भाषा शिकणे गरजेचे;राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे प्रतिपादन

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- महाराष्ट्रातील बहुतेक सर्वांना हिंदी भाषा समजते.या भाषेचा विस्तार कुठलाही प्रचार न करता झालेला आहे व हि भाषा सर्वांना जोडण्याचे कार्य करीत आहे.या भाषेसोबत आजच्या घडीला महाराष्ट्रात राहत असलेल्या प्रत्येकाने मराठी भाषा शिकणे गरजेचे असल्याचे  प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे.आर्य समाज वाशी,यांच्या वतीने आयोजित विध्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याप्रसंगी बोलत होते.

यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांची आवड-निवड हि वेगवेगळी असते त्यांनी त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करावे.आपण सर्वांनी शिक्षित होऊन सुसंस्कृत होणे गरजेचे आहे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.प्रसंगी हिंदी विषयामध्ये प्राविण्य मिळविलेल्या नेरुळ येथील डी.ए.व्ही.पब्लिक स्कुलचे विद्यार्थी नमन ठाकूर, विद्यार्थिनी ईशा जाधव,कुमार दिव्यम झा,वंशिका चंद,सान्वी शरण,फादर अंग्रेल स्कुल व जुनिअर कॉलेजचे विद्यार्थी सिद्धेश रुपेश काळे,वाणी कौर चोप्रा,वाशी इंग्लिश हायस्कुलचे विद्यार्थी आर्यन कृष्णप्रसाद,एपीजे स्कुल नेरळच्या संहिता रंगराजन,अनंतजीत पांडे यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.यावेळी राजस्थानचे खा.स्वामी सुमेधानंद सरस्वती,विवेकानंदजी परिव्रजक,राजकुमार दिवाण,धर्मवीर शास्त्री आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.