गोपाल शर्मा,पोलीस नायक
अमरावती जिल्हा प्रतिनिधी
खासदार नवनीत रवी राणा यांनी केंद्र सरकारकडे सतत केलेल्या पाठपुराव्यामुळे केन्द्र सरकारच्या रेल मंत्रालयाकडून मंजुर असलेल्या गतीशक्ती युनिट अंतर्गत विकास कामाचा आढावा बैठक नुकतीच घेण्यात आली.यात बडनेरा रेल्वे स्टेशन व विकास कामे मंजूर करण्यात आली असून त्यात ३ लीफ्ट,दोन नवीन जी एक्सलेटर,दोन्ही साईटचे सौंदर्यीकरण,मूलभूत सुविधांची कामे,नविन बगीच्या निर्माण करणे,बारा मीटरचा एफ.ओ.बी.,प्रवासी सुविधांची कामे,व्ही.आय पी.रूम,दिव्यांग प्रवासी सुविधा, व त्यांचे साठी व्हीलचेअर इत्यादी कामांकरिता तब्बल ८० कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आलेली आहे.
सदरील सर्व कामांचा आराखडा,डिझाईन,नकाशा यांची पाहणी करून अधिकाऱ्यांसोबत राणा दाम्पत्याने नुकतीच आढावा बैठक घेतली तसेच अमरावती येथे नवीनीकरण स्टेशनची इमारत पाडून नवीन इमारत निर्माण करणे,कार्पोरेट ऑफीस तयार करणे,बारा मीटरचा एफ.ओ.बी,दोन लिफ्ट अश्या प्रकारचे दोन्ही स्टेशन वरील होणारी विकास कामे मिळून ८० कोटी रुपयांच्या कामाचा आराखडा संबंधीत आढावा बैठकीत घेण्यात आला.यावेळी खासदार नवनीत रवी राणा यांनी भुसावल मध्य रेल्वेचे डी.आर.एम.एस.एस.लाहोटी यांचे मार्गर्शनाखाली रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी डी.सी.एम अनिलकुमार पाठक,अभियंता आजाद,कुशवाहा वासेकर,डि.के.मीना स्टेशन मास्तर सिन्हा,स्टेशन मास्टर लोहकरे आदि अधिकाऱ्यांचे उपस्थितीत आढावा बैठक घेतली.बैठकी दरम्यान उपमहाप्रबंधक लाहोटी साहेब यांचे मार्गदर्शनाखाली लवकरच विकास कामे होणार असल्याची माहिती अधिकारी यांनी दिली यावेळी उमेश ढोणे,अजय जैसवाल,विलास वाडेकर,आफताप खान,नूतन वासनिक,विजया घोडेस्वार,संजय मुंडले,सोनू रुगटा,समीक्षा गोटफोडे,सुधा तिवारी,खुशाल गोडाणे,वर्षा पकडे,पंकज शर्मा,मंगेश चव्हाण,अमोल मिलके,मंगेश कोकाटे,लकी पिवाल,योगेश जैस्वाल,पप्पू सूडे,दीपक तातोड,अजय बोबडे आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.