Just another WordPress site

उंटावद येथे स्व.पंडीतराव पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शवपेटीचे लोकार्पण

यावल-पोलीस नायक(प्रतिनीधी):-

तालुक्यातील उंटावद येथे जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी व्हा.चेअरमन स्व.पंडीतराव धर्मा पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचे सूपुत्र व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विनोदकुमार पंडीतराव पाटील यांच्या हस्ते सामाजीक बांधीलकीच्या माध्यमातुन लोक उपयोगी ठरणारी शवपेटीचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले.

यावेळी विकास सोसायटी कार्यालयात संपन्न झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात या शवपेटीचे लोकार्पण करण्यात आले.प्रसंगी विनोदकुमार पंडीतराव पाटील,सतिष पंडीतराव पाटील यांच्यासह विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन शशीकांत(शशी आबा)गुलाबराव पाटील,सरपंच छोटु भगवान भिल,प्रा.विश्वनाथ एकनाथ पाटील,ग्रा.प.सदस्य डिगंबर धना सपकाळे,संचालक जगदीश पाटील,मुरलीधर पाटील,अरूण सोनवणे,सचिव संजय दिनकर महाजन,साहेबराव पाटील,विकास पाटील,शांताराम पाटील,त्र्यंबक पाटील,अधिकराव पाटील,पुष्कराज पाटील, प्रथमेश पाटील,संतोष लोहार,महेबूब तडवी,सोमा कोळी,देवीदास पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थीत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.