मोदी सरकारवर टीका करतांना संजय राऊत म्हणाले की,विरोधी पक्षाचे जे प्रमुख नेते आहेत त्यांना २०२४ पर्यंत तुरुंगात टाकायचे असे धोरण मोदी सरकारचे असल्याचे दिसत आहे याचे प्रमुख कारण म्हणजे विरोधी पक्ष एक होत असल्याने त्यांच्या पायाखालची जमीन दुभंगली आहे. आम्ही सगळे एकत्र येत आहोत त्या भीतीपोटी विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांना तुरुंगात टाकायचे आणि कदाचित निवडणुका होऊ द्यायच्या नाहीत किंवा एकतर्फी निवडणुका घ्यायच्या अशा प्रकारे हुकूमशाही पद्धतीचे काम सध्या दिल्लीतून सुरू आहे अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.नागपूरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार असून यानिमित्त दर्शन कॉलनीच्या मैदानावर अतिविराट सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे.या सभेबद्दल नागपूर व विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्र वासियांना या सभेची अतिशय उत्सुकता लागलेली आहे.नागपुरच्या सभेतून महाराष्ट्राच्या पुढच्या राजकारणाची दिशा ठरविण्यात येईल असा दावाहि संजय राऊत यांनी यावेळी केला आहे.