यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील मनवेल येथील भोनक नदीवर चोपडा मतदार संघाच्या आ.लताताई चद्रकांत सोनवणे यांच्या निधीतुन मंजूर झालेल्या सिमेंट काँक्रीटिकरण बंधाराचे काम पुर्ण होण्याचा मार्गावर असून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी अडवा पाणी जिरवा मोहीम अंतर्गत पुनर्भरणाचे काम होणार आहे.
येथील गावकरी दरवर्षी लोक सहभागातून भोनक नदीवर पाणी अडवा पाणी जिरवा मोहिम यशस्वीरीत्या राबवित असतात मात्र नदीला मोठ्या प्रमाणात पुर आल्यावर बंधारे फुटुन अडविलेले पाणी पुर्णपणे वाया जात असते.सदरहू येणाऱ्या काळात पाण्याची भासवणारी टंचाई लक्षात घेता शेतकरी बांधवांनी भविष्यातील उद्धभवणाऱ्या जलसंकटावर मात करण्यासाठी भोनक नदीवर कायम स्वरुपी सिमेंट काँक्रीटिकरण बंधारे बाधण्यासाठीची मागणी नागरीकांनी माजी आ.चद्रकांत सोनवणे यांचाकडे केली होती.नागरीकांच्या या मागणीला प्रतिसाद देत आ.लताताई चद्रकांत सोनवणे यांनी या परीसरात पाण्याची टंचाई भासू नये म्हणून आमदार नीधीतुन ४६ लक्ष रुपये खर्च करून मोठा सिमेंट काँक्रीटिकरण बंधारा मंजूर केला व सदरचे बंधाऱ्याचे काम हे अंतीम टप्प्यात आले आहे.शेतकरी बांधवांच्या दृष्टीने दरवर्षी पाण्याची पातळी ही खालावत असल्यामुळे ती वाढ व्हावी म्हणून बंधाराचे काम उकृष्ट पध्दतीने चागल्या दर्जाचे व जलतगतीने काम सुरु असून सदरचे हे काम पुर्णत्वाकडे आले आहे.आमदार निधीतुन तयार करण्यात आलेल्या बंधाराचे काम चांगल्या प्रकारे झाल्याने येथील बंधारामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी अडवीले जाणार असल्यामुळे या परीसरात खालावलेली पाण्याची पातळीत वाढ होवुन शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.त्यामुळे परिसरातील शेतकरी बांधवांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.