Just another WordPress site

काटेल (वरवट बकाल) येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

संतोष थोरात,पोलीस नायक

संग्रामपूर तालुका (प्रतिनिधी):-

तालुक्यातील काटेल (वरवट बकाल)येथे विश्ववभूषण,महामानव,विश्वरत्न,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यानिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी काटेल गावामध्ये संग्रामपूर तहसीलदार मुरलीधर गायकवाड यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.सदर मिरवणूक गावातील मुख्य चौकांतून काढण्यात आली तेव्हा ठिकठिकाणी विविध मान्यवरांच्या हस्ते डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.यावेळी सरपंच अनिलभाऊ कुरवाडे, ग्रामपंचायत सदस्य मोहनभाऊ कुकडे,शेषराव वानखेडे,ग्रामपंचायत सचिव खोणे साहेब,तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष व पदाधिकारी यांच्यासह डॉ.आंबेडकर उत्सव समिती पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.