कवी बि राज उर्फ विनोद तडवी
पोलीस नायक यावल तालुका (प्रतिनिधी):-
तालुक्यातील किनगाव येथे कौमी एकता व सर्वधर्म समभाव तसेच बंधुता कायम राहावा याउद्देशाने दरवर्षी रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येते.त्यानुसार यावर्षी देखील दि.१६ एप्रिल २३ रविवार रोजी आदिवासी तडवी भिल समाजातील युवक सचिन तडवी,कवी-बि.राज तडवी तसेच नायगाव गावातील सर्व समाज बांधवांच्या वतीने ऐकत्र येऊन छोटेखाणी रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले.यानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यावल रावेर विधानसभा मतदार संघाचे आमदार शिरीषदादा चौधरी हे होते.
यावेळी यावल रावेर विधानसभा मतदार संघाचे आमदार शिरीषदादा चौधरी,माजी आमदार रमेशदादा चौधरी,माजी पंचायत समिती गटनेते शेखर सोपान पाटील,संगीतम ट्रॅव्हल्सचे संचालक तथा जे.डी.सी.सी.बँक जळगावचे संचालक विनोद देशमुख,शरद देशमुख,प्रगतशील शेतकरी चंद्रकांत चौधरी,डॉ.योगेश पालवे,माजी पंचायत समिती सदस्य प्रशांत पाटील,किनगाव सरपंच पती संजय पाटील,उपसरपंच लुकमान तडवी,माजी सरपंच मिलिंद चौधरी,माजी सरपंच टिकाराम चौधरी,योगेश पाटील आडगाव,माजी उपसरपंच लतीफ दादा तडवी,पिक संरक्षक सोसायटीचे चेअरमन प्रमोदआबा पाटील,बंटीभाऊ पाटील,नारायण चौधरी,सुनील पाटील,धोंडू कुंभार,राहुल पाटील, खुनेपिंप्रे सर,नायगाव सरपंच पती सर्फराज तडवी,मनोज देशमुख,एन.डी.तडवी,सचिन तडवी,विनोद कवी-बि.राज तडवी,भाऊसाहेब डी.एस.पाटील,किशोर आप्पा पाटील,एल.व्ही.पाटील,चेतन पाटील,निलेश पाटील,रामदास पाटील,निसार तडवी,शांताराम पाटील,चंद्रकांत कोळी,मुस्तुफा तडवी,फकिरा टेलर,कलिंदर तडवी,बिसा तडवी,फकिरा तडवी,राजू तडवी,भिकन तडवी,शरीफ तडवी,हमीद तडवी,लुकमान तडवी,सागर वायरमन,संजय तडवी,तसेच सर्वधर्मिय समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन तडवी यांनी केले तर आभार कवी बि.राज उर्फ विनोद तडवी यांनी मानले.