संतोष थोरात,पोलीस नायक
संग्रामपूर तालुका (प्रतिनिधी):-
तालुक्यातील ज्या नागरिकांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत लाभ मिळत होता परंतु काही विविध तांत्रिक अडचणी मुळे तसेच नोंदणी त्रुटींमुळे लाभ मिळण्यास अडचणी आली असेल त्यांना लाभ मिळण्यासाठी वरवट बकाल सहकार विद्या मंदिर येथे आज दि.१७ एप्रिल सोमवार रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
यानिमित्ताने आमदार संजयभाऊ कुटे व संग्रामपूर तालुक्याचे तहसीलदार मुरलीधर गायकवाड यांच्या हस्ते कार्यशाळेचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी संग्रामपूर तालुक्यातील ज्या नागरिकांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत लाभ मिळत होता परंतु काही विविध तांत्रिक अडचणीमुळे तसेच नोंदणी त्रुटींमुळे लाभ मिळण्यास अडचणी आली असेल अश्या लाभार्थ्यांना लाभ मिळण्याससाठी आज दि.१७ एप्रिल रोजी वरवट बकाल येथे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी कॅम्पचे आयोजन करण्यात आले.यावेळी आधार केवायसी,लिंक सिडीग,डुप्लिकेट आधार, पीएम किसान नवीन नोंदणी अशा आधारकार्ड बाबाच्या विविध बाबींचे पूर्तता करण्यात आली.तालुक्यातील बहुसंख्य नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला.