यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी):-
तालुक्यातील दहिगाव येथील मुख्य चौकातील शुभेच्छा फलकावरील थोर पुरुषाच्या प्रतिमा विटंबना प्रकरणातील सहा संशयित आरोपींना आज दि.१७ सोमवार रोजी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींची जामीनावर मुक्तता करत न्यायालयात आरोपपत्र दाखल होईपर्यंत त्यांना गावात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.दरम्यान गावात सोमवारी शांतता असून पोलीस बंदोबस्त कायम ठेवण्यात आलेला आहे.
तालुक्यातील दहिगाव येथील मुख्य चौकातील शुभेच्छा फलकावरील थोर पुरुषाच्या प्रतिमेची शनिवारी रात्री विटंबना केली होती याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात आकाश माळी,भूषण पाटील,वैभव पाटील,रितेश पाटील,योगेश माळी व रुपेश चौधरी या सहा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करत आरोपींना पोलीसांनी अटक केली होती.आज दि.१७ सोमवार रोजी संशयित आरोपींना येथील न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश एम.एस.बनचरे यांनी या सहा आरोपींची जामीनावर मुक्तता केली आहे मात्र पोलीसाकडून जोपर्यंत आरोपपत्र दाखल होत नाही तोपर्यंत त्यांना गावात प्रवेश करण्यास न्यायालयाने मनाई हुकूम केला आहे.दरम्यान आज सोमवारी सकाळपासून गावातील सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले असून यावल दहिगाव सावखेडा बस सेवा पूर्ववत सुरू करण्यात आली आहे.गावात पोलीस बंदोबस्त तैनात असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सहकारी करीत आहे.