रावेर-पोलीस नायक (प्रतिनिधी):-
रावेर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना पुरस्कृत लोकमान्य पॅनलच्या वतीने विविध जागांकरिताची आपल्या उमेदवारांची यादी नुकतीच जाहीर केली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज माघार घेण्यासाठी अजून काही दिवसांची मुदत बाकी असली तरी निवडणूक घडामोडी गतीमान झाल्या आहेत.या अनुषंगाने महायुतीच्या वतीने लोकमान्य पॅनलच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.यात सेवा सहकारी संस्था मतदार संघातून (सर्वसाधारण):- १)प्रल्हाद पंडित पाटील(मोरगाव),२)गोंडू रामदास महाजन (रसलपूर),३)दिलीप चुडामण पाटील (उटखेडा),४)गोपाळ लक्ष्मण नेमाडे (चिनावल),५) राहूल गोपाळ महाजन (वाघोदा),६)चेतन श्रावण पाटील( उटखेडा),७)संजय जीवराम महाजन(चोरवड),इतर मागासवर्ग (ओबीसी):- १)दुर्गादास बाबूराव पाटील(निंभोरा बुद्रुक),महिला राखीव:- १)सौ कल्पना उत्तमराव पाटील(खिरवड),२)सौ सविता दिनेश ( छोटू) पाटील( रेंभोटा),भटके-विमुक्त राखीव:- १)प्रवीण सुपडू पासपोहे (मुंजलवाडी),ग्रामपंचायत मतदारसंघ (सर्वसाधारण):- १)महेंद्र कडू पाटील (नेहेता),२)नितीन रामलाल भोगे(मस्कावद),आर्थिक दुर्बल घटक:- १)सुनील दामोदर पाटील (विवरे),अनुसूचित जाती-जमाती (एस.सी) राखीव:- १) सिकंदर समशेर तडवी( मोरव्हाल),व्यापारी मतदारसंघ :- १) रितेश संतोष पाटील (सावदा),२) शेख लुकमान शेख निसार (रसलपूर),हमाल-मापाडी मतदारसंघ:- वसंत मधुकर येवले( कोचूर)अशा प्रकारे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.हे उमेदवार भाजप तालुकाध्यक्ष राजन लासूरकर व शिवसेना तालुकाध्यक्ष दिनेश उर्फ छोटू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आले आहेत.