अजित पवारांकडे राष्ट्रवादीच्या ४०आमदारांच्या सह्यांचे पत्र रेडी? महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंपाची नांदी?
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा):-
महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप पाहण्यास मिळणार का? याच्या चर्चा सध्या जोरात सुरू आहेत यात अजित पवार हे भाजपात जाऊ शकतात किंवा भाजपाला बाहेरून पाठिंबा देऊ शकतात अशा चर्चांना सध्या उधाण आले आहे.अशावेळी आमदार अण्णा बनसोडेंसह तीन आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला असल्याने याबाबत राज्यात ही चर्चा रंगली आहे त्यातच अजित पवारांकडे५३ पैकी ४० आमदारांच्या सह्यांचे पत्र तयार असल्याची बातमी न्यू इंडियन एक्स्प्रेसने दिली आहे त्यामुळे याला आणखीनच बळ मिळत असल्याचे राजकीय नाट्यात पाहायला मिळत आहे व असे घडले तर राज्यात पुन्हा एकदा राजकीय महानाट्य जनतेला पाहण्यास मिळेल अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे.
अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादीच्या ५३ पैकी ४० आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र तयार आहे त्यामुळे जर वेळ आली तर राज्यपालांना हे पत्र अजित पवार सोपवतील त्यामुळे शिंदे सरकारला कुठलाही धोका निर्माण होणार नाही.सर्वोच्च न्यायालयाने जर एकनाथ शिंदे व त्यांच्या १६ आमदारांना अपात्र ठरवले तर अजित पवार हे पाऊल उचलू शकतात?सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर या संदर्भातला निर्णय घेतला जाईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.या सगळ्या घडामोडींवर तसेच अजित पवार नाराज असल्याच्या चर्चांवर शरद पवार यांनी याबाबत मौनव्रत धारण करून कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नसून शरद पवार यांनी जेव्हा अदाणींच्या संदर्भात जी भूमिका मांडली त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अजित पवार नॉट रिचेबल झाले होते व आता अजित पवार यांच्याकडे ४० आमदारांच्या सह्यांचे पत्र असल्याचे वृत्त समोर आल्यानंतरही शरद पवार यांनी या सगळ्या घटनाघडामोडीबाबत मौन बाळगले आहे.तसेच २०१९ मध्ये जेव्हा पहाटेच्या शपथविधीचा प्रयोग झाला होता त्यावेळी शरद पवार यांनी सगळ्या आमदारांना परत बोलवत अजित पवार यांचे बंड मोडून काढले होते.आता राज्यात नेमके काय होणार हे पाहणे मोठे रंजक व महत्त्वाचे ठरणार आहे.याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय व अपक्ष आमदार रवी राणा यांनी स्पष्टच म्हटले आहे की,पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह हे जेव्हा हिरवा कंदिल दाखवतील तेव्हा अजित पवार हे नॉट रिचेबल होतील व भाजपात जातील असे म्हटले आहे.तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांनी अजित पवार हे जी भूमिका घेतील ती आम्हाला मान्य राहील असे म्हटले आहे त्यामुळे आता या सगळ्या घडामोडीमुळे नेमके महाराष्ट्राच्या राजकारणात काय होणार?याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.