Just another WordPress site

बीडमध्ये शेतातून गेल्याच्या रागातून शाळकरी मुलाची हत्या ;तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

खून करून मुलाचा मृतदेह लिंबाच्या झाडाला टांगला

बीड-पोलीस नायक (प्रतिनिधी):-
बीडच्या माजलगाव तालुक्यातील नित्रुड परिसरात अत्यंत धक्कादायक अशी घटना समोर आली आहे.गुलाम मोहम्मद मुर्तूजा शेख वय १५ वर्षे हा शाळकरी मुलगा शेतातून गेला म्हणून त्याला मारहाण करून आधी त्याची हत्या केली त्यानंतर त्याचा मृतदेह झाडाला टांगण्यात आला अशी ही हृदयद्रावक घटना नित्रुड परिसरात नुकतीच घडली आहे याप्रकरणी कैलास डाके,महादेव डाके व हनुमंत वानखेडे या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,बीडच्या माजलगाव तालुक्यातील नित्रुड या गावातील इयत्ता ९ वीत शिकत असलेला गुलाम मोहम्मद मुर्तूजा शेख वय १५ वर्षे हा विद्यार्थी मंगळवारी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान त्याची बहीण सिमरन व छोटा भाऊ हुजैफा यांना घेऊन आजोबांच्या शेतात सरपण आणायला गेला होता त्याचवेळी कैलास डाके,महादेव डाके व हनुमंत वानखेडे या तिघांनी गुलामला रस्त्यात अडवून आमच्या शेतातून का जातोस?असे विचारत त्याला मारहाण करून त्याला जमिनीवर आडवे पाडून मारले तसेच सरपणासाठी गुलामने सोबत आणलेल्या ओढणीनेच या तिघांनी त्याचा गळा आवळून हत्या केली.सदरील सगळा प्रकार पाहून गुलामची बहीण सिमरन व लहान भाऊ हुजैफा हे दोघंही घाबरून पळत घर गाठले व घडलेला प्रकार सगळ्यांना सांगितला.त्यानंतर घरातील मंडळींनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता अनेकांना चक्रावल्यासारखे झाले यावेळी पालखी महामार्गावरच्या नित्रुडपासून हाकेच्या अंतरावर तिघे मारेकऱ्यांनी गुलामचा मृतदेह झाडावर लटकून ठेवलेला होता.याप्रकरणी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व मृतदेह झाडावरून खाली उतरवून सदरील मृतदेह शवविच्छेदनासाठी माजलगावच्या ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आला.घटनेदरम्यान मोहम्मद गुलाम या विद्यर्थ्याला बेदम मारहाण करण्यात आली व नंतर त्याचा मृतदेह लिंबाच्या झाडाला टांगण्यात आला ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरताच याठिकाणी ग्रामस्थांनी पाहण्यासाठी एकच गर्दी केली.याप्रकरणी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तिन्ही आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.