यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील शहरातील प्रगतीशील केळी उत्पादक शेतकरी किशोर देवराम राणे यांची केळी उत्पादक शेतकरी संघाच्या वतीने महाराष्ट्र केळी रत्न कार्यगौरव पुरस्कार २०२३ साठी निवड करण्यात आली आहे.किशोर देवराम राणे यांना हा पुरस्कार २३ एप्रील रोजी रावेर येथे आयोजित एका भव्य कार्यक्रमामध्ये दिला जाणार आहे.
किशोर देवराम राणे हे गेल्या काही वर्षापासून दर्जेदार केळीचे विक्रमी उत्पादन घेत आहे.ते आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करतांना दिसून येत आहेत दरम्यान मागील वर्षी त्यांची केळी विदेशात गेली होती तेव्हा केळी उत्पादन घेतांना नावीन्यपूर्ण प्रयोग व दर्जेदार केळीचे उत्पादन काढणाऱ्या या शेतकऱ्याला त्याच्या या कार्याची दखल घेऊन त्याची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.त्यांना पुरस्कार समितीचे अध्यक्ष अतुल माने-पाटील,केळी उत्पादक शेतकरी संघाचे व्यवस्थापक किरण चव्हाण यांच्या वतीने सदर पुरस्कार त्यांना दिला जाणार आहे. किशोर राणे यांची या पुरस्काराकरीता निवड झाल्याबद्दल त्यांचे यावल तालुक्यातुन सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.