Just another WordPress site

यावल कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शेतकरी विकास पॅनल व सहकार पॅनल समोरासमोर

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ३० एप्रिल रोजी होत असलेल्या पंचवार्षीक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी गुरुवारी तब्बल १०० उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने रिंगणात आता ४१ उमेदवार राहिले असून काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस, आणि शिवसेना (ठाकरे गट )यांचे महाविकास आघाडी प्रणित शेतकरी विकास पॅनल तर भाजप-शिवसेना शिंदे गट यांच्या सहकार पॅनलमध्ये समोरासमोर लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले असून यात पाच अपक्ष उमेदवारांनी देखील आपले उमेदवारी अर्ज कायम ठेवले आहे.

महाविकास आघाडीच्या शेतकरी विकास पॅनलचे नेतृत्व आमदार शिरीष चौधरी,माजी आमदार रमेश चौधरी,नितीन चौधरी,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा.मुकेश येवले,शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख गोपाळ चौधरी हे नेतृत्व करीत आहेत तर सहकार पॅनलचे नेतृत्व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी,शरद महाजन,तालुकाध्यक्ष उमेश फेगडे,गणेश नेहेते,पांडूरंग सराफ,शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तुषार उर्फ मुन्ना पाटील करत आहेत.या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनल व सहकार पॅनलमध्ये खरी लढत असून यात सरळ लढतीचे चित्र पुढीलप्रमाणे आहे.शिवसेना ( ठाकरे ) गट राष्ट्रवादी कॉंग्रेस आणी काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडी प्रणित शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत.सहकारी सोसायटी मतदार संघ:-प्रभाकर नारायण सोनवणे,केतन दिगंबर किरंगे,ज्ञानेश्वर श्रीधर ब-हाटे,भानुदास दगडू चोपडे,विनोदकुमार पंडितराव पाटील,अनिल दंगलराव साठे,प्रदीप बाळकृष्ण पाटील,योगेश सिताराम पाटील (ईमाव),नयना चंद्रशेखर चौधरी, नंदा गोपाळ महाजन (महिला राखीव),अनिल प्रल्हाद पाटील (विजा/भज),ग्रामपंचायत मतदार संघ :-सर्वसाधारण मध्ये सुनील नामदेव फिरके, शेखर सोपान पाटील,सुलेमान कान्हा तडवी (अनु.ज.),पोर्णिमा राकेश भंगाळे (आर्थिक दुर्बल घटक),व्यापारी मतदारसंघ अशोक त्र्यंबक चौधरी,सैय्यद युनूस सैय्यद युसुफ,हमाल मापारी मतदारसंघ :-सुनील वासुदेव बारी हे आहेत

तर भाजप शिवसेना (शिंदे गट) सहकार पॅनलचे उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत.सहकारी सोसायटी मतदार संघ :- राकेश वसंत फेगडे,हर्षल गोविंदा पाटील,सागर राजेंद्र महाजन,दीपक नरोत्तम चौधरी,पंकज दिनकर चौधरी,उमेश प्रभाकर पाटील,संजय चुडामन पाटील,नारायण शशिकांत चौधरी (ईमाव),कांचन ताराचंद फालक,राखी योगराज ब-हाटे (महिला राखीव),उज्जैनसिंग भावलाल राजपूत ( विजा/ भज), ग्रामपंचायत मतदार संघ :-सर्वसाधारण मध्ये विलास चंद्रभान पाटील,सूर्यभान निंबा पाटील,यशवंत माधव तळेले (आर्थिक दुर्बल घटक),दगडू जनार्दन कोळी (अनु.ज.),व्यापारी मतदारसंघ:-जितेंद्र पद्माकर चौधरी,निलेश सुरेशचंद्र गडे,हमाल मापारी तोलारी मतदारसंघ :-सचिन पंढरीनाथ बारी तसेच अपक्ष उमेदवारांमध्ये ग्रामपंचायत मतदार संघातुन सत्तार सुभान तडवी,योगराज यशवंत सोनवणे,ग्रामपंचायत मतदार संघातुन नंदकिशोर एकनाथ सोनवणे,यशवंत तुळशीराम सपकाळे व व्यापारी मतदार संघातुन नरेंद्र आबाजी पाटील असे पाच उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.सदरील माहिती निवडणूक अधिकारी तथा जिल्हा विशेष लेखापाल पी.एफ.चव्हाण यांनी दिली आहे.या निवडणुकीदरम्यान मावळते सभापती तुषार सांडूसिंग पाटील यांनी गेल्या पंचवार्षिक कार्यकाळात भाजपा शिवसेनेच्या माध्यमातून अडीच वर्षे सभापती पदाची धुरा सांभाळणारे तुषार सांडूसिंग पाटील ( मुन्नाभाऊ ) यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.