Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
मुंबई-पोलीस नायक (प्रतिनिधी):-
संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेवर भाजपाकडून सातत्याने टीका करण्यात येत आहे यात गुरुवारी एका कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीसांनी राऊतांना टोला लगावत त्यांनी सकाळचे अभंग बंद करावे असे विधान केले होते.त्यानंतर आता भाजपाचे नेते आशिष शेलार यांनीही संजय राऊतांवर खोचक टीका केली आहे.ते मुंबईत एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान बोलत होते.स्वप्नील सावरकरांनी आताच उदय निरगुडकरांचा परिचय करून देताना म्हटले की,ज्यांच्या आजोबांचा सावरकांशी परिचय होता त्या नातवाने सावरकरांवर पुस्तक लिहिले ते निरगुडकर कुठे व दुसरीकडे ज्यांच्या आजोबांनी सावकरांचा अपमान केला म्हणून मणिशंकर अय्यर यांना जोडे हाणले ते आदित्य ठाकरे कुठे? त्यामुळेच मला निरगुडकर श्रेष्ठ वाटतात.निरगुडकरांनी घेतलेल्या भूमिकेचा व्यक्तीच्या माध्यमातून परिचय करून द्यायचा असेल तर त्यांनी महाभारतातल्या संजयची भूमिका पार पाडली आहे असे मी म्हणेल परंतु आजकाल संजय हा शब्द शिवीसारखा वाटतो.मी सर्वच संजय बद्दल बोलत नाही तर सकाळी साडेनऊ वाजता येणाऱ्या संजय बद्दल बोलतोय अशी खोचक टीका आशिष शेलार यांनी केली आहे.
दरम्यान सकाळच्या पत्रकार परिषदेवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काल संजय राऊतांना टोला लगावला असून गुरुवारी माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटले होते की,राजकारणातील कटुता संपवायची असेल तर संजय राऊतांनी सकाळचे अभंग बंद करायला हवे तरच राज्यातील राजकीय वातावरण शुद्ध होईल असे ते म्हणाले होते.