Just another WordPress site

ईद-उल-फित्र (रमजान ईद) सणाचे महत्व व इतिहास

राजेंद्र व्ही.आढाळे,पोलीस नायक

कार्यकारी संपादक

ईद-उल फित्र -इस्लामिक सण

रमजान-ईद-ए-मिलाद म्हणजे ‘ अल्लाह ‘चे प्रेषित हजरत महंमद पैगंबर यांचा जन्मदिवस.जगभर ‘ ईद-ए-मिलादुन्नबी ‘हा सण इस्लामी वर्ष हिजरी रबीअव्वल महिन्याच्या बारा तारखेला मोठया उत्साहात साजरा केला जातो.मुस्लिम धर्माचे दोन मोठे सण म्हणजे ईद उल फितर व दुसरी ईदुज्जुह.ईद उल फितर ही आनंद साजरा करण्याची ईद मानली जाते.आपापसात बंधुत्वाचे संबंध प्रस्थापित करून प्रेम व आनंदाने साजरा केला जाणारा सण अशी त्याची ओळख आहे याउलट ईदुज्जुहा म्हणजे कुर्बानी व त्यागाचे पर्व मानले जाते.ईद उल फितर हा अरबी भाषेतील शब्द आहे.ईद या शब्दाचा अर्थ आनंद असा आहे तर फितर म्हणजे दान करणे परिणामी या दिवशी अन्नाच्या स्वरूपात दान केले जाते.फितर हा मुस्लिम शरीयत कायद्यातील मापदंड आहे.

रमजानची प्रार्थना

सणाचे स्वरूप

परस्पर शुभेच्छा

 

पवित्र रमजान महिन्यात चंद्रदर्शन होईपर्यंत दररोज उपवास म्हणजे रोजे पाळले जातात यामध्ये सूर्योदयापूर्वी अन्नग्रहण केले जाते. सूर्यास्तापर्यंत उपवास पाळला जातो.सूर्यास्ताला प्रार्थना झाल्यावर उपवास सोडला जातो असे दररोज रोजे पाळले जातात.या काळात कुराण ग्रंथाचे वाचन व चिंतन-मनन केले जाते.रमजान महिन्यातील रोजे संपल्यानंतर ईद येते.ईदला नवीन वस्त्र परिधान करून मुस्लिम बांधव ईदगाह किंवा मशिदीत नमाज अदा करायला जातात.अल्लाच्या प्रती नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधव एकमेकांना अलिंगन देऊन ईदच्या शुभेच्छा देतात.या दिवशी मित्र असो वा शत्रू ते दोघांची गळाभेट घेऊन शुभेच्छा देतात.ईदच्या दिवशी मुस्लिम धर्मातील महिलावर्गात मोठा उत्साह दिसून येतो.पहिल्या दुसऱ्या रोजापासून घरात त्या शेवया तयार करायला सुरुवात करतात.मात्र हे चित्र आता केवळ ग्रामीण भागातच दिसते शहरी भागात सगळ्याच गोष्टी तयार मिळायला लागल्या आहेत.ईदला आपल्या घराला रंगरंगोटी करून आप्तजनांना आपल्याकडे शिरखुर्मा खाण्यासाठी आमंत्रित करतात.रमजान ईदचा दुसरा दिवस हा ‘बासी ईद’ नावाने ओळखला जातो.

खुलताबादचे स्थानमहात्म्य :-

ईद-ए-मिलादच्या दिवशी खुलताबादचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे.खुलताबाद येथील हजरत बावीस ख्वाजा सय्यद जैनोद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्यात १४०० वर्षांपूर्वीचा हजरत मोहम्मद पैगंबर यांचा पवित्र पोशाख ‘पैराहन-ए-मुबारक‘ गेल्या ७०० वर्षांपासून जतन करून ठेवण्यात आलेला आहे.हजरत महंमद पैगंबर यांच्या पोशाखामुळे खुलताबाद येथील हजरत ख्वाजा जैनोद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्याला काश्मीरमध्ये असलेल्या हजरतबल दर्ग्याच्या बरोबरीचे महत्त्व आहे.येथे दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून मुस्लिम भाविक मोठया श्रद्धेने लाखोंच्या संख्येने गर्दी करतात.येथील समोरच असलेल्या हजरत ख्वाजा बु-हानोद्दिन यांच्या दर्ग्यात ‘मुॅं-ए-मुबारक‘ (मिशीचा केस) व पैराहन-ए-मुबारक (पवित्र पोशाख) ईद-ए-मिलादच्या दिवशी दर्शनासाठी खुला केला जातो.ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त ‘मुबारक‘ या पर्वकाळात हा पोशाख व मिशीचा केस दर्शनासाठी काचेच्या पेटीत खुला ठेवण्यात येतो यावेळी गोडभात प्रसाद म्हणून वाटला जातो.

प्रेषित हजरत महंमद पैगंबर

इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित हजरत महंमद पैगंबर यांचा जन्म इ.स.५७१ मध्ये सौदी अरेबियाच्या मक्का या गावी झाला.जन्माअगोदरच महंमद पैगंबर यांचे पितृछत्र हरपले होते.वयाच्या सहाव्या वर्षी त्यांच्या मातोश्रीना पण देवाज्ञा झाली.लहानपणीच माता-पित्याचे छत्र हरपलेल्या अशा या एकाकी पडलेल्या बालकाचे त्याच्या चुलत्याने संगोपन केले.लहानपणापासूनच शिक्षणापासून वंचित राहिलेला हा बालक धर्माचा संस्थापक बनला.आपल्या जीवनकाळात हजरत मोहमद यांनी समस्त मानवजातीला उदारता,समता,विश्वबंधुत्व,सामाजिक न्याय आणि समरसतेची शिकवण दिली त्यांची शिकवण केवळ काही विशिष्ट जातीधर्मापुरती मर्यादित नव्हती तर संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी होती.

Leave A Reply

Your email address will not be published.