यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
येथे अक्षय तृतीयानिमित्त यावल फैजपूर रस्त्यावरून श्री मनुदेवी मंदीरापासुन तर बुरूज चौकापर्यंत बहिरम बुवा यांच्या बारागाड्या शनिवारी सायंकाळच्या सुमारास मोठ्या उत्साहात ओढण्यात आल्या.
सदर बारागाड्या ओढण्याच्या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष मंगल रावजी बारी,बारागाड्या भगत किशोर बारी,बगले गोलु बारी,राहुल चौधरी हे होते.यावेळी फैजपूर रस्त्यावर असलेल्या श्रीमनुदेवी मंदीर परिसराजवळ असलेल्या आदिवासी मुलींच्या वस्तीगृहापासुन ते बुरूज चौकापर्यंत या बारागाड्या ओढण्यात आल्या.या बारागाड्या ओढण्याच्या कार्यक्रमात पाहण्यासाठी मोठ्या संख्येत भाविक भक्तांची उपस्थिती होती.प्रसंगी शांतता समितीचे सदस्य सैय्यद युनुस सैय्यद युसुफ,पुंडलीक बारी,गुलाम रसुल हाजी गुलाम दस्तगीर,हाजी गफ्फार शाह,राहुल बारी,कदीर खान,अस्लम शेख नबी,अनिल जंजाळे,नईम शेख,हाजी ईकबाल खान यांच्यासह विविध सामाजीक संस्थेचे पदाधिकारी कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते.सदरील संपुर्ण कार्यक्रम उत्साहात व शांततेत संपन्न व्हावा याकरिता पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर,पोलीस उपनिरिक्षक सुनिता कोळपकर,सहाय्यक फौजदार मुजफ्फर खान पठाण,सहाय्यक फौजदार असलम खान,सहाय्यक फौजदार नितिन चहाण यांच्यासह पोलिस कर्मचारी,दंगा नियंत्रण पथकाचे राखीव पोलीस कर्मचारी व गृहरक्षक दलाचे कर्मचारी यांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.