Just another WordPress site

उद्योगमंत्री श्री उदय सामंत यांची नांदगाव पेठ पंचतारांकित एम.आय.डी.सी ला भेट

गोपाल शर्मा,पोलीस नायक

अमरावती जिल्हा (प्रतिनिधी):-

उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विशेष सहकार्याने मंजूर झालेल्या अमरावतीच्या विकासाच्या दृष्टीने ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या पिएम मित्रा मेगा टेक्सटाइल पार्क,भारत डायनॅमिक आदींच्या उभारणी संदर्भात आमदार रवी राणा व खासदार सौ नवनीत रवी राणा यांच्या विशेष आग्रहानुसार उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नुकतीच नांदगाव पेठ पंचतारांकित एम.आय.डी.सी ला भेट दिली आहे.

पुणे मुंबईच्या धर्तीवर अमरावती नांदगाव पेठ एमआयडीसीमध्ये स्थानिक बचत गट,छोटे उद्योजक यांना व्यवसाय करता यावा यासाठी आमदार रवी राणा व खासदार सौ नवनीत रवी राणा यांच्या पाठपुराव्यातून शासन गाळे बांधून सर्व सुविधा उपलब्ध करून देणार असून या ठिकाणी प्लग अँड प्ले योजना सुरू होणार आहे.तसेच अमरावती मध्ये मोठे उद्योजक यावे यासाठी देशविदेशातील उद्योजकांना अमरावतीत आणून सादरीकरण यासाठी देशातील मोठ्या शहरांमध्ये रोड शो,व्हिजन आदी आयोजित करणार असल्याबाबत उद्योगमंत्री श्री उदय सामंत यांची नावीन्यपूर्ण कल्पना अंमलात येणार आहे.यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पंचतारांकित एमआयडीसी मधील रेमंड, व्हि.एच.एम, सियाराम,श्याम इंडोफेम,आदी कंपन्यांना प्रत्यक्ष भेटी देवून त्रुटी,समस्या जाणून घेतल्या सोबतच एमआयडीसीसाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळास भेटून त्यांच्या जमिनीचा मोबदला तात्काळ देण्याचे निर्देश उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.काही कंपन्या जलशुध्दीकरण न करता सरळ त्यांचे दूषित पाणी लगतच्या गावात,शेतकऱ्यांच्या शेतात सोडतात ज्यामुळे शेतजमिनी खराब होत असून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे आणि गावकऱ्यांना विविध गंभीर आजार होत असल्याचे आमदार रवी राणा यांनी मंत्री श्री उदय सामंत यांच्या लक्षात आणून देताच मंत्र्यांनी यासंबंधात तातडीने चौकशी करून दोषींवर तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहे.
खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी भुसंपादीत जमिनीचा वाढीव मोबदला आणि स्थानिकांना रोजगार देण्याचा विषय मांडताच मंत्री श्री उदय सामंत यांनी २ तासात अहवाल सादर करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

तसेच ग्रामीण भागातील लोकांना व्यवसाय करता यावा यासाठी खादी ग्रामोद्योग द्वारे ग्रामविकास योजना राबवून या एमआय डीसी मध्ये ५०० स्केअर मीटरचे गाळे बांधून देवून सर्व सुविधा अल्पदरात उपलब्ध करून देवून ग्रामीण भागातील लघु उद्योजक,बचत गट आदींना मुख्य प्रवाहात येता यावे व शेतकऱ्यांना जोडउद्योग करता यावे जेणेकरून शेतकरी आत्महत्या कमी होतील अशी मागणी आमदार रवी राणा यांनी करताच उद्योगमंत्री श्री उदय सामंत यांनी सदर मागणीला तात्काळ मंजुरी देवून १५ दिवसाचे आत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले त्याचबरोबर भातकुली,अंजनगाव सूर्जी,दर्यापूर,अचलपूर,परतवाडा,धारणी या एमआयडीसीचा विकास करण्यासाठी सुद्धा मंत्रीमहोदयांनी निर्देश दिले आहेत.ड्रीम प्रोजेक्ट व अमरावतीच्या विकासाची गंगा ठरणाऱ्या पी एम मित्रा मेगा टेक्सटाइल पार्कसाठी अधिग्रहित जमीनीवर २०० कोटी रुपये खर्च करून विदेशातील प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून अगदी चकचकीत व उच्च दर्जाच्या मूलभूत सुविधा जसे की रस्ते,स्ट्रीट लाईट,सौंदर्यीकरण आदी बाबी तातडीने सुरू करण्याचे निर्देश मंत्री महोदयांनी यावेळी दिले.यावेळी वीएचएम कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपावर मंत्र्यांनी तोडगा काढावा अशी मागणी खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी करताच तात्काळ या कंपनीच्या संचालकांना बोलवून किमान वेतन कायद्याप्रमणे वेतन देण्याची व अपघातग्रस्तांना तात्काळ मदत देवून बदली केलेल्या ६ कर्मचाऱ्यांना पुन्हा मूळ जागी सामावून घेण्याचे आदेश मंत्री श्री उदय सामंत यांनी यावेळी दिले.या बैठकीला मंत्री उदय सामंत यांच्यासमवेत खासदार सौ नवनीत रवी राणा,खासदार डॉ अनिल बोंडे,आमदार रवी राणा,पोलिस आयुक्त श्री नवीनचंद्र रेड्डी,एम आय डी सीचे प्रादेशिक अधिकारी प्रशांत पापडकर,एसीई राजेश झंझड,डेप्युटी सिओ तोमारे साहेब,येई राहुल बनसोड,उपजिल्हाधिकारी सिधभट्टी,तहसीलदार संतोष काकडे,शिवसेना जिल्हाध्यक्ष अरुण पडोळे,भाजपा शहर अध्यक्ष किरण पातूरकर,युवा स्वाभिमान जिल्हाध्यक्ष जितु दुधाने,कामगार जिल्हाध्यक्ष विलास वाडेकर,शहर अध्यक्ष नीलेश भेंडे,अनुप खडसे,अजय मोरया,सुधा तिवारी,विक्रांत कुयरे,ओंकार मोहोड,मंगेश कोकाटे, योगेश जायसवाल आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.