गोपाल शर्मा,पोलीस नायक
अमरावती जिल्हा (प्रतिनिधी):-
शेतकऱ्यांकरिता दिवाळी सारखा सण देखील कारागृहात घालवणारे आमदार रविभाऊ राणा हे नेहमीच संधीच सोन करीत असतात याचाच प्रत्यय दि.२२ शनिवार रोजी आला.यादरम्यान मुंबई ते अमरावती मंत्री उदय सामंत यांच्यासोबत आमदार रविभाऊ राणा यांनी हवाई दौरा करून शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत आपला जिव्हाळा दाखवला.
यावेळी आमदार रवीभाऊ राणा यांनी मंत्री उदय सामंत यांना अकाली पावसाने झालेल्या पिक नुकसानग्रस्त क्षेत्राची प्रत्यक्ष विमानातून पाहणी करुन शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खराब झाल्याची सविस्तर माहिती दिली तर आमदार रवि राणा यांनी जिल्हातील नुकसानग्रस्त भागाचे त्वरित पंचनामे करुन आपत्तीग्रस्त शेतकरी यांना शासकीय मदत देण्याची मागणी केली.या विमान प्रवासादरम्यान आमदार रवि राणा यांनी मंत्री उदय सामंत यांना अमरावती केंद्रीय टेक्सटाईल पार्क तसेच नांदगाव पेठ एमआयडीसी ,अमरावती एमआयडीसी व शहरातील विविध उद्योग व संपूर्ण शेतकऱ्यांच्या शेती दाखविल्या व झालेल्या पिक नुकसानीची माहिती दिली तसेच संपूर्ण उद्योजकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी उद्दोगांची पाहणी करून आढावा बैठक घेण्याकरिता आमदार रवि राणाचा आग्रह मान्य करत त्यावर मंत्री सामंत हे लागलीच अमलबजावणी करणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.