सरकारचे ‘डेथ वॉरंट’ तयार असून फक्त सही बाकी असल्याने १५ दिवसांमध्ये हे सरकार कोसळणार-संजय राऊत यांचे भाकीत
जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी):-
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचे “डेथ वॉरंट” तयार झाले असून आता फक्त त्यावर कोण व कधी सही करणार? हे ठरणे बाकी आहे त्यामुळे येत्या १५ दिवसांमध्ये हे सरकार कोसळेल असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे ते आज दि.२३ एप्रिल रविवार रोजी जळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात आज ठाकरे गटाची महासभा असून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या सभेला संबोधित करणार आहेत.सदरील सभेची संपूर्ण तयारी झाली असून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत दोन दिवसांपासून जळगावात असून सभेच्या तयारीचा आढावा घेत आहेत.