जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी):-
उष्माघातामुळे मुंबईत गेल्या आठवड्यात दुर्दैवाने नको ते घडले त्यामुळे आपण पिंप्राळ्यात जनतेच्या काळजीने त्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून बोलणार नाही परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहिल्यानंतर तीन महिन्यांनी त्याच्या अनावरणासाठी अवश्य येणार आहोत अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पिंप्राळा येथील उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.शहरातील पिंप्राळा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे त्याच्या भूमिपूजननासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे उपस्थित होत्या.उन्हामुळे जनतेला त्रास होऊ नये म्हणून या कार्यक्रमास धावती भेट दिली असून प्रारंभी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.
व्यासपीठावर उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे यांचे पुष्पगुच्छ तसेच स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले त्यानंतर महापौर जयश्री महाजन यांनी रश्मी ठाकरे यांचे स्वागत केले यावेळी त्यांनी उशिरा कार्यक्रमास आल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.उन्हामुळे आपण मोठे भाषण करणार नाही असे स्पष्ट करताना ते म्हणाले गेल्या आठवड्यात उष्माघातामुळे मुंबईत नको ते घडले त्यामुळे आपण जनतेची काळजी घेऊन दुपारचा कार्यक्रम घेणार नव्हतो परंतु ऐकेल तो शिवसैनिक कसला त्यांच्या आग्रहाखातर आपण या ठिकाणी केवळ उपस्थिती दिली आहे.आपण जनतेची माफी मागतो परंतु आपण तीन महिन्यांनी या पुतळ्याचे काम पूर्ण झाल्यावर अनावरणासाठी नक्की येणार आहोत त्या वेळीही जनतेला कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही अशीच वेळ आपण घेणार आहोत असे त्यांनी नमूद केले आहे.