“आईच्या कुशीवर वार करणारी गद्दारांची अवलाद..काही लोक बाप बदलतात व बाप चोरतात”उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
'तुमच्या मेहनतीचे रक्त पिणाऱ्या या गद्दारांना मारायला तोफ नको तुमचे आशीर्वाद देणारे हात माझ्या सोबत-उद्धव ठाकरे यांची भावनिक साद
जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी):-
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे काल सभा पार पडली.या सभेत उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर महागाईच्या मुद्यावरुन हल्लाबोल केला तर राज्य सरकारवर टीका करतांना त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्रकाश टाकला.राज्यातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणावर भाष्य केले असून चोरलेला धनुष्यबाण घेऊन निवडणुकीत उतरण्याचे आव्हान ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची शिवसेना व भाजपला दिला आहे.सगळा जल्लोष बघितल्यावर शिवसेना कुणाची?हे दिसतय,पाकिस्तान सुध्दा सांगेल खरी शिवसेना कोणाची पण निवडणुक आयोगाला मोतीबिंदू झालाय तो त्यांचा प्रश्न ? असे उद्धव ठाकरे म्हणाले.हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र,महाराष्ट्र बघतोय.काही जणांना वाटले तेच शिवसेना पण अशा अनेक घुशी आम्ही बघितल्या आणि निवडणुकीत आपटल्या.आज खरच तात्यांची उणीव भासते,४० गद्दार गेले तरी फरक पडत नाही पण एक निष्ठावंत गेला की उणीव जाणवते.तात्यांच्या पुतळ्याचे अनावरण करावे लागेल असे वाटले नाही.वैशालीताईंचा अभिमान असून त्यांचे घराणे हे शेतकऱ्यांसाठी झटणारे आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले.मेहनत तुम्ही करता आणि टिकोजीराव वर बसतात आता पुन्हा त्यांना खाली खेचण्याची वेळ आली असून निवडून आलेले गद्दार झालेत पण निवडून देणारे आजही माझ्या सोबतच आहेत असे उद्धव ठाकरे म्हणाले.अंबादास दानवे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या.आपले सरकार होत तेव्हा करोनाचे जागतिक संकट होते.नैसर्गिक संकटात आपण सरकारमध्ये असताना मदत केली.आता सरकारच अवकाळी यांनी एकाही संकटात मदत केली नाही मग हे बोलावेच लागणार असे उद्धव ठाकरे म्हणाले.तसेच बहिणाबाई जर आज असत्या तर त्यांना पण या सरकारने तुरूंगात टाकले असते.बहिणाबाईंच्या कवितेच्या ओव्या त्यांनी वाचून दाखवल्या.आईच्या कुशीवर वार करणारी गद्दारांची अवलाद आपली नाही.काही लोक बाप बदलतात आणि बाप चोरतात.तुमच्या मेहनतीचे रक्त पिणारे हे गद्दार आहेत त्यांना मारायला तोफ नको.आज माझ्याकडे काही नाही पण तुम्ही आशीर्वाद देणारे हात माझ्या सोबत त्यांनी येऊन दाखवावे असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले आहे.
भाजप हे आव्हान नाही परंतु ते सत्तेवर आहेत त्या दरम्यान जे नुकसान होईल ते दूर कसे करायचे ते आव्हान आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले. दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्येची बातमी त्यांनी वाचून दाखवली.२६ वर्षाचा मुलगा आत्महत्या करतोय लोकसंख्येचे देशात अमाप पीक पण तरुण मुले आत्महत्या करताहेत.राजा निवडायचा हक्क तुमचा आहे पण तुमच्या डोळ्यात धूळफेक केली जात आहे.लोकसभेच्या निवडणुकीत मोदी महागाई वर बोलायचे.शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले असेल तर हात वर करुन सांगा.निवडणूक आली की अबकी बार आता यांना आपटा असे आवाहन ठाकरे यांनी केले.सत्यपाल मलिक यांनी पुलवामाचे सत्य सांगितले.काश्मीर बद्दल बोलले आता त्यांच्या मागे सीबीआय लावली.पुन्हा काश्मीरात जवान मारले गेले पण अमित शहा निवडणुक प्रचारात कर्नाटकात आहेत अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. त्यावेळी मलिक यांना काही बोलू नका म्हणून सांगितले गेले.काही लोक लाचारी म्हणून तुमच्याकडे येतात मग तुम्ही काय त्यांच्यावर गोमूत्र शिंपडतात असे भाजपचे काम सुरु आहे.यांना भारत मातेचा कुठलाही पक्ष नको फक्त भाजप ठेवायची आहे असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.२०१४ मध्ये युती तुटल्याची आठवण उद्धव ठाकरे यांनी सांगितली तेव्हा खडसेंच्या गळ्यात युती तोडल्याचे खापर टाकले.आज नाव चिन्ह नाही पण जनसागर उसळतोय हे शिवसेनाप्रमुखांचे आशीर्वाद आहेत.आपल्यातील लोक बाहेर कसे जातील हे भाजपकडून प्रयत्न सुरु आहेत आणि इतर पक्षातील भ्रष्ट पक्षात घेतात असे उद्धव ठाकरे म्हणाले.संजय राऊतांचे कौतुक आहे.नितीन देशमुख,राजन साळवी,वैभव नाईक जे माझ्यासोबत आहेत त्यांची छळवणूक सुरु आहे.या एकदाचे जेल भरोच करुयात आव्हाने कसले देता नामर्दपणा करतायत.राहुल गांधींबाबत पण तेच त्रास देणे सुरु आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मी घरीबसून जे सरकार चालवले ते तुम्ही वणवण फिरुन पण तुम्ही करु शकत नाही.घराणेशाहीत पण एक परंपरा असते तुम्ही म्हणता तुम्ही निघून जाल पण जनतेचे काय?वैशालीताई लढण्यासाठी माझ्यासोबत आहेत.वैशालीताईंच्या पाठीशी तुम्हाला राहावे लागेल असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले.सर्वोच्च न्यायालयात आपल्याला न्याय मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे असे ठाकरे म्हणाले.मी तीन वर्षात एकतरी प्रसंग मला सांगा की मी हिंदुत्व सोडले.मुख्यमंत्री म्हणून मी घटनेची शपथ घेतली सर्व धर्मीयांना समान वागणूक दिली.मी हिंदुत्व सोडले नाही सोडणार नाही पण आपले हिंदुत्व शेंडी जानव्याचे नाही तर राष्ट्रीयत्व आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले.भाजपचे हिंदुत्व काय समजतच नाही.एका राज्यात गोहत्याबंदी एका राज्यात नाही उलट लोकांना चिरडतायत हे आमचे हिंदुत्व नाही.ठाण्याचा रोशनी शिंदे हल्ला प्रकरणाचा संदर्भ देखील ठाकरे यांनी दिला हे असले यांचे हिंदुत्व हे आमचे हिंदुत्व नाही.रोशनी शिंदेवरच गुन्हे दाखल केले त्यांची तक्रार घेतली नाही असे त्यांनी सांगितले.पाचोरा जिवंत आहे.भगव्यावर गद्दारांचा अधिकार नाही ज्याचे स्वतःचे काही नाही तेच चोरी करताहेत. खारघरच्या दुर्दैवी घटनेची आठवण करत ठाकरेंनी सोहळ्याचा हेतूच वाईट होता असे म्हटले.भाजपला आव्हान देत असून त्यांनी जाहीर करावे ते मिंधेच्या नेतृत्वात लढणार आहेत का?असे उद्धव ठाकरे म्हणाले.तुम्ही मोदी आणि चोरलेले धनुष्यबाण घेऊन या मी माझ्या नावावर येतो.आग दिसतेय म्हणून निवडणुका घेण्याची हिंमत होत नाही.आता निवडणुका लावा मी तयार आहे.मशालाची धग अशी लावू की तुमचे सिंहासन हलेल असे उद्धव ठाकरे म्हणाले.महाराष्ट्र गद्दारांचा नाही वीरांचा आहे.दोन्ही हात वर करुन वज्रमूठ दाखवा.वाट बघत होतो घुसणारे कधी घुसतायत.मी राज्यभर येणार आहे.तुमच्यावर पुढील निवडणुकीची जबाबदारी घेऊन.महाराष्ट्र पिंजून काढणार गद्दारांची विल्हेवाट लावण्यासाठी.दिवसा सूर्य आग ओकत असतो पण तुमची जी डोकी आहे ती तापली पाहिजेत असे सांगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विधानाची आठवण उद्धव ठाकरेंनी करुन दिली.