Just another WordPress site

ऐनपूर येथे बारागाड्या ओढतांना बारगाड्यांखाली येऊन वृद्धाचा मृत्यू तर आठ जण जखमी

रावेर-पोलीस नायक (प्रतिनिधी):-

तालुक्यातील ऐनपूर येथे दि.२३ एप्रिल रविवार रोजी बारीघाट येथील बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी बारागाड्या ओढतांना बैलगाडीच्या जुंपणाचा फटका बसून ताबा सुटल्याने एका वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू तर आठ जण जखमी झाली असल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.दिनकर रामकृष्ण जैतकर(कोळी) रा.ऐनपूर ता.रावेर असे मृत्यू झालेल्या प्रौढ व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,तालुक्यातील ऐनपूर येथे वर्षनुवर्षेच्या परंपरेनुसार मरीमाता यात्रा उत्सवानिमित्ताने अक्षयतृतीयेच्या दुसऱ्या दिवशी दि.२३ एप्रिल रोजी ऐनपूर येथील बारीघाट येथे बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतांना बैलगाडीच्या जुंपणाचा फटका बसून गाड्या दिशाहीन होऊन ताबा सुटल्याने भाविकांमधील प्रेक्षक दिनकर रामकृष्ण जैतकर (कोळी),भगतीन मंगलाबाई भिल,ईश्वर भिल,किशोर पाटील,सुभाष भिल,नामदेव भिल,मोहन महाजन,बगल्या सुनील महाजन,ज्यु ओढणारे नारायण महाजन हे जखमी झाले.पोलीस प्रशासन व ग्रामस्थांच्या वतीने जखमींना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले.यात दिनकर रामकृष्ण कोळी वय-६० वर्षे यांना जबर मार बसल्यामुळे त्यांना रावेर ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले तसेच बाकी जखमींवर उपचार सुरु आहेत.यावेळी भगत म्हणून सोपान भिल व बगले म्हणून सचिन महाजन व सुनील महाजन यांनी काम पहिले.तसेच यात्रेदरम्यान निंभोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार ज्ञानेश्वर चौधरी,नितीन पाटील,योगेश चौधरी व होमगार्ड कर्मचारी यांनी पोलीस बंदोबस्त चोख ठेवला.

Leave A Reply

Your email address will not be published.