“दिल्लीत महाराष्ट्रातील मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली पडद्यामागे सुरु”-खासदार संजय राऊत यांचा खळबळजनक दावा
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा):-
सध्या दिल्लीत महाराष्ट्रातील मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली सुरु असून या सगळ्या घडामोडी पडद्यामागे सुरु आहेत व लवकरच राज्यातील मुख्यमंत्री आणि सरकार बदलेल असा खळबळजनक दावा खासदार संजय राऊत यांनी नुकताच केला आहे.राज्याचा मुख्यमंत्री बदलण्यामागील कारण सगळ्यांना माहिती असून राज्याचे नेतृत्त्व करण्यात तसेच भाजपला हवे ते साध्य करण्यात एकनाथ शिंदे हे अपयशी ठरले असल्याने भाजपला आमचे सरकार पाडायचे होते त्यासाठी एकनाथ शिंदेंचा वापर करून ते काम पूर्ण केले परंतु राजकीयदृष्ट्या भाजपला महाराष्ट्रात ताकद देण्यात हे मुख्यमंत्री अपयशी ठरले आहेत.सरकार आल्यापासून मिंधे गटासोबत भाजपही रसातळाला जात असून बदनाम होत आहे त्यामुळे या सरकारचे आता थोडेच दिवस शिल्लक राहिले असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे ते आज दि.२४ सोमवार रोजी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते.
यावेळी संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असल्याच्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला असून दिल्लीत मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरु आहेत की नाही हे देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांना जाऊन विचारल्यास अवचित्याचे राहील तसेच या सगळ्या घडामोडी मुळे मुख्यमंत्री सध्या तणावात असून ते हल्ली मंत्रालयात जातात का हे त्यांना विचारा असे संजय राऊत यांनी म्हटले.तर आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुक महाविकास आघाडी एकत्र लढणार की नाही? याबाबत बोलायचे झाल्यास आमची तशी इच्छा आहे परंतु केवळ इच्छा असून चालत नसून जागावाटपातील अडचणींवर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत त्याबाबत अद्याप चर्चा झाली नसल्याने आत्ताच काही सांगता येत नाही असे शरद पवार यांनी म्हटले.मविआच्या उभारणीत शरद पवार यांचा महत्त्वाचा वाटा असून काँग्रेस,राष्ट्रवादी व शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्र राहिले तर २०२४ मध्ये आपण भाजपचा पराभव करू शकतो ही पवार साहेबांची भूमिका आहे त्यामुळे ते महाविकास आघाडी बाबत अशी काही भूमिका घेतील असे मला वाटत नाही असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.