Just another WordPress site

शिंदे गटाच्या आमदारांना पुन्हा ठाकरे गटात घेणार ? नीलम गोऱ्हे यांचे सूचक वक्तव्य

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा):-

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ सुरू असून एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर अजित पवारांच्या बंडखोरीच्या चर्चेने महाराष्ट्रातील राजकारण तापले असून शिंदे गटातील आमदार पुन्हा ठाकरे गटात येऊ इच्छित आहेत अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत त्यामुळे शिंदे गटातील आमदारांना पुन्हा ठाकरे गटात घेणार आहात का ? यासाठी कोणते निकष असतील ? यावर ठाकरे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.शिंदे गटातील आमदारांना पुन्हा ठाकरे गटात घेतले जाऊ शकते का? असा प्रश्न विचारला असता नीलम गोऱ्हे म्हणाल्या की,आताची राजकारणातील परिस्थिती पाहिली तर प्रचंड कटुता व मतभेद आहेत. कुठल्याही परिस्थितीत एकमेकांना सांभाळून घ्यायचे नाही हीच भूमिका सगळ्यांची दिसत आहे त्यामुळे भविष्यात काय घडणार आहे ? किंवा काय परिस्थिती असेल ? याबाबत काहीही सांगता येणार नाही.यापूर्वी राजकारणात अनेकांना अनाकलनीय व अविश्वसनीय वाटतील अशा घटना घडलेल्या आहेत त्यामुळे काही गोष्टींची उत्तरे नियती किंवा देवच देऊ शकतो त्यामुळे शिंदे गटातील आमदारांना परत घ्यायचे की नाही? याबाबत उद्धव ठाकरेंशी कधीही चर्चा झाली नाही असेही नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले आहे.‘त्या एबीपी माझा’शी बोलत होत्या.

शिंदे गटातील काही आमदारांनी परत येण्याची इच्छा प्रदर्शित केली तर काय होऊ शकते ? असे विचारले असता नीलम गोऱ्हे पुढे म्हणाल्या की,कोणती माणसे कोणत्या भूमिकेतून निर्णय घेतात यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात त्यामुळे ईडी व सीबीआयच्या भीतीमुळे जे लोक तिकडे गेले आहेत त्यांची भीती कधी नष्ट होईल ? हा प्रश्न आहे.त्यांची भीती नष्ट होईल अशी परिस्थिती राष्ट्रीय स्तरावर होईल का ? यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत त्यामुळे मला वाटते की याचे उत्तर मिळायला आपल्याला आणखी काही काळ वाट बघावी लागेल.२०१४ ला आमची भाजपाबरोबरची युती तुटली होती तेव्हा ‘पोपट’ मेला असे सांगण्यात आले होते परंतु २०१९ ला पुन्हा युती झाली आणि पुन्हा ती तुटली. हे सगळ पाहिल्यानंतर मला वाटते की राजकारणात कायमचे कुणी कुणाचे शत्रू नसतात आणि कायमचे कुणी कुणाचा मित्र नसतो त्यामुळे राजकारणात आपल्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांचं हित,आपला आत्मसन्मान कशात आहे ? आपल्यासाठी कोणती गोष्ट योग्य आहे? कोणाची मैत्री आपल्याला ओझे आहे? कुणाशी शत्रुत्व असले तर आपला समन्वय होऊ शकतो? याचा विचार करायला हवा अशी प्रतिक्रिया नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.