दरीकोणूर गावी उमदी रस्त्यावर असलेल्या बेळुंखे वस्तीवर प्रियांका बिरूदेव बेळुंखे (वय ३२) व मोहिनी बिरूदेव बेळुंखे (वय १४) या दोघींचा गळा आवळून खून केल्याची घटना रविवारी रात्री घडली होती याप्रकरणी बिरूदेव बेळुंखी याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि,जत तालुक्यातील दरीकोणूर गावी उमदी रस्त्यावर असलेल्या बेळुंखे वस्तीमधील रहिवाशी बिरूदेव बेळुंखी हा त्याची पत्नी प्रियांका बिरूदेव बेळुंखे हिच्यावर सातत्याने चारित्र्यावरून संशय घेत होता.या बाबीवरूनच रविवारी रात्री या दोघे पती-पत्नीमध्ये जोरदार वाद सुरू होता या वादातच पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला तसेच या दरम्यान आईवडिलांचे भांडण ऐकून मोठी मुलगी मोहिनी ही त्या ठिकाणी आली तिनेही वडिलांच्या हल्ल्यातून आईला वाचविण्याचा प्रयत्न केला असता तिला ढकलून दिले मात्र घडलेला प्रकार ती कोणाला तरी सांगेल यामुळे बिरूदेव बेळुंखी याच्याकडून तिचाही गळा आवळून खून करण्यात आला.हा प्रकार झाल्यानंतर पतीने नामानिराळा राहण्यासाठी पत्नी कोठेतरी गेली आहे,बेपत्ता झाली आहे असे सांगत गावात व नातेवाईकांकडे विचारणा सुरू केली होती मात्र पोलीस पाटील तानाजी पाटील यांना संशय आल्याने ही माहिती उमदी पोलिसांना दिली.पोलिसांनी राहत्या घरात जाऊन पाहिले असता दोघींचे मृतदेह आढळून आल्याने पोलिसांचा संशय बळावला.परीणामी बिरूदेव बेळुंखी याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी केली जात आहे.