मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-वेदांत प्रकल्पावरून राज्य सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात असतांनाच शिंदे फडणवीस सरकारने औद्योगिक विकास महामंडळाच्या भूखंड वाटपाच्या निर्णयाला नुकतीच स्थगिती दिली आहे.सदरील स्थगिती दिल्याने राज्याला हजारो कोटी रुपयांचा फटका बसला असल्याची माहिती समोर आली आहे.याणित्ताने जवळपास १२ हजार कोटींची गुंतवणूक यामुळे रखडली आहे.शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती दिलेल्या १९१ भूखंड वाटपापैकी अनेक भुकंद वाटपाच्या निर्णयाचे पुनर्विलोकन करून त्यांना मंजुरी देण्याच्या हालचालींना वेग दिल्याची माहिती मंतरल्यातील सूत्रांकडून देण्यात आली आहे.
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यापासून आघाडी सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांना स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यानुसार राज्यातील विविध औद्योगिक विकास महामंडळाच्या भूखंड वाटपास देण्यात आली होती.या महामंडळाची विविध १६ विभागीय कार्यालये व त्या अंतर्गत येणाय्रा स्थानिक कार्यालयाकडून १ जूनपासून करण्यात आलेल्या भूखंड वाटपास स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला.या निर्णयानुसार विविध स्तरावर वाटप करण्यात आलेल्या भूखंडाचे सर्व प्रस्ताव उद्योग विभागाकडे पाठविण्याच्या सूचना महामंडळास देण्यात आल्या आहेत.महामंडळाने १२ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचे १९१ भूखंड वाटपाचे प्रस्ताव उद्योग विभागाकडे सादर केले आहे.नियमानुसार वाटप झालेल्या भूखंडांवरील स्थगिती उठविण्यात येणार आहे,अशी माहिती उद्योग विभागातील सूत्रांनी दिली आहे.