महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व सध्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नुकतीच एका कार्यक्रमात मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली असून तुम्हाला २०२४ ला मुख्यमंत्री व्हायला आवडेल का? असा प्रश्न त्यांना विचारला असता अजित पवार म्हणाले की, २०२४ का आत्ताही मुख्यमंत्री व्हायला आवडेल.सदरील मुलाखत देण्या अगोदर अजित पवार हे भाजपासोबत जातील व येत्या काही दिवसात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील अशाही चर्चा रंगल्या होत्या मात्र या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचे अजित पवार यांनी माध्यमांना सांगितले आहे.तसेच आपण शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले असले तरी यानंतरही दुसऱ्याच दिवशी अजित पवार यांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्यास आवडेल अशी इच्छा व्यक्त केली.त्यानंतर आता त्यांच्या सासुरवाडीने अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत म्हणून संत गोरोबाकाकांना साकडे घातले असल्याने याबाबतची चर्चा आता राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे.
अजित पवार हे धाराशिव जिल्ह्यातील तेरई या गावाचे गावकरी असल्याने त्यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवताच तेरई गावात अजित पवार राज्याचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर झळकले आहेत.अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे माहेर धाराशिव आहे.अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवताच त्यांच्या सासुरवाडीच्या ग्रामस्थांनी चक्क संत गोरोबाकाकांना साकडे घातले आहे.तेरई गावातल्या ग्रामस्थांनी संत गोरोबाकाकांची विधीवत पूजा केली त्यानंतर अजित पवार हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून साकडे घातले आहे या बातमीची सध्या जोरदार चर्चा चर्चिली जात आहे.२०१९ मध्ये अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सकाळचा शपथविधी करून महाराष्ट्राच्या जनतेला धक्का दिला होता त्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आले होते.महाविकास आघाडीच्या कार्यकाळातही अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते.२१ जून २०२२ या दिवशी एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर २९ जून २०२२ या दिवशी उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळले होते.यानंतर अजित पवार यांनी विरोधी पक्षाची धुरा सांभाळली असून आता धक्कातंत्राचा वापर करून महाराष्ट्रात काही वेगळे चित्र पाहण्यास मिळणार का? याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.