Just another WordPress site

यावल बाजार समिती निवडणुकीत ९३.६३ टक्के मतदान : १८ संचालकांचे भविष्य मतपेटीत बंद

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

संपुर्ण तालुक्याचे लक्ष वेधणाऱ्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालक पदाच्या निवडीसाठी शुक्रवारी यावलसह फैजपूर व साकळी येथे मतदान शांततेत पार पडले.या तीनही केन्द्रावर एकूण २६०४ मतदानापैकी २४३८ मतदान झाले असून मतदानाची ९३.६३ टक्केवारी राहिली.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी पी.एफ.चव्हाण,निवडणुक निरिक्षक तहसीलदार महेश पवार,उप विभागीय पोलीस उपअधीक्षक डॉ.कुणाल सोनवणे,आमदार शिरीष चौधरी यांनी सर्व मतदान केंद्रांना भेटी देऊन निवडणुकी संदर्भातील आढावा घेतला.सदर निवडणुकीस सकाळ पासूनच मतदारांनी मतदानास चांगला प्रतिसाद दिला.या निवडणुकीच्या तिन मतदान केन्द्रासाठी केन्द्रनिहाय एकुण आठ केन्द्राध्यक्ष म्हणुन एस.पी.चकाल,एम.गवळी,एस.ए.साळुंखे,आर.ए.येवले,पि.एन.सुर्वे,ए.जी.मेखे,डी.जे.तडवी व ई.ए.हावळे यांनी काम पहिले.प्रसंगी दुपारीच्या वेळेस शहरासह तालुक्यात तुफानी वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्याने काही काळ मतदान मंदावले होते त्यानंतर पुन्हा मतदानास वेग आला होता.या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस पक्ष आणी शिवसेना ( ठाकरे ) गटाच्या महाविकास आघाडी प्रणित शेतकरी विकास पॅनल व भाजप शिवसेना प्रणित सहकार पॅनलमध्ये खरी लढत होणार असून यात पाच अपक्ष उमेदवारदेखील या निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहे.याबाबत मतदानानंतर दोन्ही पॅनलकडून उमेदवारांच्या विजयाचे दावे प्रतिदावे केले जात असले तरी मात्र रविवारी दुपारपर्यंत मतमोजणी नंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे.यात एकूण मतदार संघनिहाय एकूण मतदान त्यापैकी झालेले मतदान व गटानुसार झालेली टक्केवारी  पुढीलप्रमाणे आहे.सेवा सह.संस्था-६०४/५९७ – ९८.८४ टक्के,ग्रा.पं.६५९/६४१ – ९७.२७ टक्के,व्यापारी ३३३/३२० – ९६.१० टक्के,हमाल/तोलारी १००८/८८० – ८७.३० टक्के अशी आहे.मतदानाच्या पेट्या उमेदवाराच्या समक्ष येथील पंचायत समितीच्या स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आल्या असून त्यास सील लावण्यात आले आहे.३० एप्रिल रविवार रोजी येथील पंचायत समितीच्या सभागृहात सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला सुरूवात होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पी.एफ.चव्हाण यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.