शिंदे-फडणवीस सरकारने प्रथम मुंबईत नुकतीच ही योजना सुरू केली असून आता या योजनेचा राज्यभरात विस्तार करण्यात येत आहे. त्यानुसार १ मे २३ रोजी नागपूर जिल्ह्यातील १३ तालुक्यांसह नागपूर शहरात १ असे एकूण १४ दवाखाने तसेच वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया,भंडारा या जिल्ह्यांतही २१ दवाखाने असे एकूण ३५ दवाखाने सुरू होणार आहेत.या दवाखान्यांमध्ये रुग्णावर औषधोपचार,विविध रक्तचाचण्या व औषधही मोफत मिळतील.”हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यात हा संपूर्ण उपचारच नि:शुल्क राहील. याशिवाय एक्स-रे,सोनोग्राफी या निदान चाचण्यांकरिता संलग्न असलेल्या डायग्नॉस्टिक (निदान) केंद्रांवर स्वस्त दरात तपासणी करण्यात येईल. तसेच हे दवाखाने दुपारी २ ते रात्री १० या वेळात सुरू राहतील असे सूत्रांकडून कळविण्यात आले आहे.