जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
तालुक्यातील जळकेतांडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज दि.२९ एप्रिल २३ रोजी शाळा पूर्वतयारी मेळावा क्रमांक एकचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कैलास पवार केंद्रप्रमुख शिरसोली हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भंगू चव्हाण,उपाध्यक्ष सुरेश चव्हाण सदस्या दूर्गा तंवर,माया चव्हाण,ग्रा.पं सदस्या गीताबाई राठोड,अंगणवाडी सेविका कमलबाई चव्हाण,सोनार अंगणवाडी मदतनिस व गावातील नवागत बालके,मातापालक,व नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्तविक शाळेचे मुख्याध्यापक सोमनाथ पाटील यांनी केले तर सुत्रसंचालन वनमाला हातकर यांनी केले.प्रसंगी मेळाव्याचे फित कापून उद्यघाटन गीताबाई राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.तर सरस्वती मातेचे पुजन व पुष्पहार अर्पण कैलास पवार यांनी केले तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फूलेंच्या प्रतिमेचे पुजन व पुष्पहार अर्पण भंगू चव्हाण यांनी केले.यावेळी नवागतांचे स्वागत औक्षण व हार घालून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले उपस्थित मान्यवरांचा सत्कार शाळेच्यावतीने करण्यात आला.यानंतर सातही स्टाॕलवरिल क्रिया नवागतांनी केल्या सेल्फी पाॕईंटवरही फोटो घेण्यात आले,नंतर नवागतांच्या हाताच्या बोटांचे ठसे घेण्यात आले.व त्यांना शाळापूर्व तयारी पुस्तिकेचे वाटप करून खाऊ देण्यात आला.आभार श्रीमती वनमाला हातकर यांनी मानले.