यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी) :-
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षीक निवडणुकीची मतमोजणी आज दि.३० एप्रील २३ रोजी येथील पंचायत समिती सभागृहात होणार असुन यासाठी निवडणुक निर्णय अधिकारी पी.एफ.चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संपुर्ण यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.
यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षीक निवडणुकीसाठीचे दि.२८ एप्रील रोजी तालुक्यातील तिन मतदान केन्द्रांवर ९३.६३ टक्के मतदान झाले होते यात २६०४ मतदानापैकी २४३८ मतदान झाले आहे.आज दि.३० एप्रील २३ रोजी यावल पंचायत समितीच्या नविन प्रशासकीय ईमारतीच्या सभागृहात सकाळी १० वाजेपासून मतमोजणीस सुरुवात होणार आहे.यासाठी निवडणुक निरिक्षक महेश पवार, निवडणुक निर्णय अधिकारी पी.एफ.चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीकरिता एकुण आठ टेबल्स लावण्यात आले असुन प्रत्येकी टेबलवर चार कर्मचारी असे एकुण ३२ कर्मचारी मतमोजणीच्या प्रक्रीयेत सहभागी राहणार आहेत.या निवडणुकीच्या मतमोजणीच्या एकुण ८ फेऱ्या होणार असुन दुपारी २ वाजेपर्यंत संपुर्ण निकाल लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.