Just another WordPress site

यावल तालुक्यात दुसऱ्या दिवशीही वादळीवाऱ्यासह पावसामुळे पिकांचे नुकसान

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

शहरासह तालुक्यात काल सायंकाळी चार वाजेपासून विविध ठिकाणी अचानक वादळी वारा व मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्यामुळे शेतकरी बांधवांच्या केळी पिकांचे व कापणीस आलेल्या मका या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.सदरील अचानक वादळीवाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असल्याने शेतकरीवर्ग कमालीचा हवालदिल झाला आहे.

तालुक्यात काल दि.२९ एप्रिल रोजी किनगाव,नायगाव,मालोद,वाघझीरा,चुंचाळे,बोराळे,सावखेडा सिम,दहिगाव,विरावली,कोरपावली,मोहराळा, हरिपुरा,सातोद,कोळवद,परसाडे,वड्री,डोंगर कठोरा,सांगवी बु.हिंगोणा सह इतर ठिकाणी अचानक वादळीवाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या मका व केळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असुन याबाबत तालुक्यात कुठेही नुकसानीचे अद्यापि वृत्त प्राप्त झालेले नाही.मात्र शहरात शुक्रवारच्या दिवसी भरणाऱ्या आठवडे बाजारात मोठया प्रमाणावर शेतकरी व जिल्ह्यातुन विविध ठीकाणाहुन येणाऱ्या व्यापारी व व्यवसायिक वर्गाची अचानक आलेल्या वादळी वIऱ्यासह पावसामुळे एकच धावपळ होवून चांगलीच धांदल उडाली होती.तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशीही वादळाचा तालुक्यात फटका बसला असून  गुरुवारी तालुक्यातील यावल किनगाव फैजपूर परिसरात महसूल विभागाच्या प्राथमिक पाहणीच्या माध्यमातुन मिळालेल्या माहीतीनुसार १८८ शेतकऱ्यांचे मका व केळी पिकाचे ३३ % टक्केचे वर नुकसान झाले असून नुकसानीचा अंतिम आकडा समजलेला नाही ही माहिती यावलचे तहसीलदार महेश पवार यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.