यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालक पदासाठी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपा-सेना-रिपाई (आठवले गट) प्रणित शेतकरी विकास पॅनलने १५ जागा पटकावून दणदणीत विजय मिळविला आहे तर राष्ट्रवादी पक्ष,काँग्रेस व शिवसेना (ठाकरे गट) यांच्या महाविकास आघाडीला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले असून या निवडणुकीत दोन माजी सभापतींचा पराभव झाला आहे हे विशेष ! .यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या शेतकरी विकास पॅनलने हा सलग चौथ्यांदा हा विजय मिळवुन कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुनश्च प्रवेश मिळवला आहे.रविवार दि. ३o एप्रील २३ रोजी येथील पंचायत समितीच्या नूतन ईमारतीच्या सभागृहात सकाळी १० वाजेपासुन मतमोजणी प्रक्रीया शांततेत पार पडली.
संपुर्ण तालुक्याचे लक्ष वेधणाऱ्या या निवडणुकीत विजयी उमेदवार व मतदार संघनिहाय मिळालेली मते पुढील प्रमाणे आहे.यात सहकारी सेवा संस्था मतदार संघात ( सर्वसाधारण )सहकार पॅनलचे हर्षल गोविंदा पाटील (३११),दीपक नरोत्तम चौधरी (३१०),उमेश प्रभाकर पाटील (३०८), राकेश वसंत फेगडे (२९९),सागर राजेंद्र महाजन (२९४),पंकज दिनकर चौधरी (२८९),संजय चुडामण पाटील (२८२),इतर मागासवर्गीय प्रवर्गामध्ये नारायण शशिकांत चौधरी (३९४),महिला राखीव कांचन ताराचंद फलक (३५१),राखी योगराज ब-हाटे (३३२),भटक्या विमुक्त जाती जमाती व विमा प्रवर्ग उज्जैनसिंग भाऊलाल राजपूत (३२४),ग्रामपंचायत मतदार संघ-सर्वसाधारण प्रवर्ग – विलास चंद्रभान पाटील (२९७), सूर्यभान निंबा पाटील (२९६),अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग -दगडू जनार्दन कोळी (३२५),आर्थिक दुर्बल घटक प्रवर्ग यशवंत माधव तळेले (३२१),व्यापारी आडते मतदार संघ महाविकास आघाडीचे अशोक त्र्यंबक चौधरी(१८८),सैय्यद युनूस सैय्यद युसुफ (१६७),तर
हमाल मापाडी तोलारी मतदारसंघातुन महाविकास आघाडीचे सुनील वासुदेव बारी(४६०)उमेदवार विजयी झाले आहेत.याकामी निवडणूक निर्णय अधिकारी पी.एफ.चव्हाण,तहसीलदार तथा निवडणूक निरीक्षक महेश पवार,सहाय्यक निवडणूक अधिकारी मनोज भारंबे व सुमारे ३२ कर्मचारी यांचे नियंत्रणाखाली मतमोजणी शांततेत पार पडली.यावेळी ग्रामपंचायत मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शेखर सोपान पाटील व सहकार पॅनलचे सूर्यकांत निंबा पाटील यांच्यामध्ये तीन मतांचा फरक असल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार शेखर पाटील यांनी फेर मतमोजणीची मागणी केल्यावरून निवडणूक निर्णय अधिकारी पी.एफ.चव्हाण यांनी दुसऱ्यांदा मतमोजणीचे आदेश दिले.परिणामी फेर मतमोजणी केली असता त्यात कोणताही बदल झाला नाही.यावेळी प्रशासनाच्या वतीने मतमोजणी केन्द्रावर पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त चोख ठेवण्यात आला.