Just another WordPress site

यावल तालुक्यात ठिकठिकाणी महाराष्ट्र दिनानिमित्ताने ध्वजारोहण

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय

येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व सामाजिक न्याय पर्व २०२३ यांच्या संयुक्त विद्यमाने ६३ व्या महाराष्ट्र दिनानिमित्ताने ध्वजारोहण व कामगार दिनानिमित्त विचार गोष्टींचा कार्यक्रम महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

यानिमित्त संस्थेचे जेष्ठ संचालक जयवंतराव येवले व मान्यवरांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करुन ध्वजारोहण करण्यात आले.तर प्रमुख पाहुणे म्हणुन महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.अर्जुन पाटील हे उपस्थित होते.याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उपप्राचार्य प्रा.एम.डी. खैरनार यांनी महाराष्ट्र हे सुजलाम सुफलाम राज्य असून महाराष्ट्र स्थापनेसाठी १०५ लोकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले अशी माहिती विशद केली.कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे यांनी मार्गदर्शन करतांना महाराष्ट्र भुमी ही छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांची कर्मभुमी म्हणुन नावाजलेली आहे तसेच समर्थ रामदास व संत तुकाराम ह्या संत महंताचे योगदान लाभलेले राज्य आहे त्यांचे विचार प्रत्येकाने आचरणात आणायला हवे अशी अपेक्षा व्यक्त केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.एस.पी.कापडे यांनी केले तर आभार कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा.संजय पाटील यांनी मानले.यावेळी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वृंद,शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी आदि या कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्हा परिषद मराठी शाळा तसेच ग्रामपंचायत कार्यालय डोंगर कठोरा

तालुक्यातील डोंगर कठोरा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत व ग्रामपंचायत कार्यालयात महाराष्ट्र दिन ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला.यानिमित्त जिल्हा परिषद शाळेत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासाहेब आढाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.तर ग्रामपंचायत कार्यालयातील ध्वजारोहण सरपंच नवाज तडवी यांच्या हस्ते करण्यात आले.त्याचबरोबर उर्दू शाळेतील ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रफिक फत्तु तडवी यांच्या हस्ते करण्यात आले.प्रसंगी राष्ट्रगीत म्हणून राष्ट्रीय ध्वजाला सलामी देण्यात आली.

यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासाहेब आढाळे,सरपंच नवाज तडवी,केंद्र प्रमुख महंमद तडवी,उपसरपंच धनराज पाटील, ग्रामविकास अधिकारी ए.टी.बगाडे,तलाठी वसीम तडवी,माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मनोहरदादा महाजन,ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य दिलीप तायडे,शिक्षण तज्ञ अनिल पाटील,खुशाल कोळी,सुरेश झांबरे,कल्पना राणे,आशा आढाळे,कल्पना पाटील,रवींद्र पाटील,जिल्हा परिषद मराठी शाळा मुख्याध्यपिका विजया पाटील,उपशिक्षक शेखर तडवी,उर्दू शाळा मुख्याध्यापक इस्माईल तडवी,शिक्षिका सकीना तडवी,राजू तडवी,चैताली चौधरी,प्रदीप पाटील,कल्पेश कोल्हे,कांचन तायडे,खेमचंद्र पाटील,सायबू तडवी आरोग्य सेविका लता चौधरी यांच्यासह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.