शरद पवार यांनी कुर्डुवाडी दौरा न करणेबाबत धमकीचा फोन;पोलिसांनी घेतली गंभीर दखल
शरद पवारांनी न घाबरता केला कुर्डुवाडीचा दौरा पूर्ण
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अध्यक्ष शरद पवार यांना आज कुर्डुवाडीमध्ये दौऱ्याकरिता येऊ नये अशा आशयाच्या धमकीचा फोन आल्याची माहिती समोर अली आहे.आज सकाळी कुर्डुवाडी येथे शरद पवार यांच्या नियोजित दौऱ्याचे आयोजन करण्यात आलेले होते.अशात एका अज्ञाताकडुन कुर्डुवाडी येथे येऊ नये अशा धमकीचा फोन आल्याने या दौऱ्याबाबत साशंकता निर्माण झाली होती परंतु सदरील कुर्डुवाडी येथील दौरा शरद पवार यांनी निर्धोक व न घाबरता पूर्ण केला आहे.या प्रकरणाची पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून अज्ञाताची कसून चौकशी करीत आहेत.
शरद पवार यांनी कुर्डुवाडी मध्ये येऊ नये अशी धमकी एका अज्ञात व्यक्तीकडून देण्यात आली होती.या धमकीनंतरही शरद पवार यांनी न घाबरता कुर्डुवाडीचा दौरा यशस्वीपणे पूर्ण केला आहे.परंतु फोन करणाऱ्या व्यक्तीबाबत अजून कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नसली तरी हा फोन सोलापूर वरून आला असल्याचे स्पष्ट झालेले आहे.मुंबई कंट्रोल रूमला हा फोन आला होता. याबाबत पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून धमकी देणाऱ्या व्यक्तीच्या फोन नंबर सोबत अज्ञात व्यक्तीचा छडा लावण्याकरिता पोलीस कसून तपास करीत आहे. लवकरच अज्ञाताला शोधण्यात पोलीस प्रशासनाला यश येईल असा विश्वास पोलीस सूत्रांकडून दिला जात आहे.