Just another WordPress site

कल्याण-रावेर बसमधून महिलेची तिन लाखाची सोन्याची पोत लांबविली

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

येथील पोलीस स्टेशन परिसरात काल दि.४ रोजी सांयकाळच्या सुमारास अचानक एक प्रवाशांनी भरलेले बस दाखल झाली व हा काय प्रकार आहे?अपघात झाला की काय? हे बघण्यासाठी नागरीकांची गर्दी केली व पोलीसांनी लागलीच बसमध्ये बसलेल्या प्रवाशांची झाडा झडती घेतली असता एका महीलेची तिन लाखाची सोन्याची पोत चोरीस गेली असल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की,बेबाबाई जगन्नाथ चव्हाण वय ६१ वर्ष राहणार राजघाट बुरहानपुर (मध्य प्रदेश) या काल दि.४ एप्रील रोजी चोपडा बसस्थानकावरून सायंकाळी ५ ते ५ . ३० वाजेच्या सुमारास आपल्या गावी बुरहानपुर जाण्यासाठी कल्याण ते रावेर जाणाऱ्या बस क्रमांक एमएच २० बिएल २२७१ या बसने आपला मुलगा शैलेन्द्र जगन्नाथ चव्हाण यांच्या सोबत प्रवास करीत असतांना कुणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ४० ग्राम वजनाची तिन लाख रुपये किमतीची सोन्याची पोत लांबविल्याची घटना घडली आहे.सदरील प्रकार बेबाबाई चव्हाण यांच्या लक्षात धानोरा बस स्थानकावर बस थांबल्यावर लक्षात आला तेव्हा या बसमधील चालक ममराज हिरामण राठोड व वाहक भरत जगन्नाय माळी यांनी सरळ बस सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास यावल पोलीस स्टेशनमध्ये आणली.यावेळी उपस्थित पोलीस कर्मचारी यांनी बसमधील सर्व प्रवाशांची तपासणी केली असता त्यात काही मिळुन आले नाही.अखेर यावल पोलीसांनी दागीने धानोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरले गेले असल्याने आपण चोपडा पोलीस स्टेशनमध्ये आपली तक्रार दाखल करावी असे बेबीबाई चव्हाण यांना सांगितले व बसही आपल्या पुढील प्रवाशासाठी बुरहानपुरकडे मार्गस्थ करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.