Just another WordPress site

अट्रावल येथील विवाहित महीलेचा विषारी द्रव्य सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

तालुक्यातील अट्रावल येथील एका विवाहीतेने काहीतरी विषारी द्रव्य सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असता यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.मोहीनी बारेला यांनी वेळीच उपचार केल्याने सदरील महिलेचे प्राण वाचविण्यात यश आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,तालुक्यातील अट्रावल येथे राहणाऱ्या एका २८ वर्षीय विवाहीत महिलेने काल दि.५ एप्रील रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरात संतापाच्या भरात खोकल्याची औषध घेत आहे असे घरातील मंडळीला सांगुन काहीतरी विषारी द्रव्य सेवन करुन आपले जिवन संपवण्याचा प्रयत्न केला.यावेळी सदरील महिलेला वांत्या होऊ लागल्याचा प्रकार लक्षात आल्याने महिलेच्या सासु व  दिर यांनी रिक्शाद्वारे तात्काळ त्या महिलेस उपचारासाठी यावलच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.प्रसंगी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.मोहीनी बारेला व त्यांचे सर्व आरोग्य कर्मचारी यांनी वेळीच दक्षता घेत उपचार केल्याने सदर महिलेस जिवदान मिळाले आहे.याबाबत यावल पोलीस ठाण्यातील पोलीसांनी सदरच्या आत्महत्या करू पाहणाऱ्या त्या विवाहीत महिलेचा जबाब नोंदविला आहे.संतापाच्या भरात आत्महत्या करणाऱ्या या महिलेस एक मुलगी व एक मुलगा असे दोन बाळ आहेत.यावल येथील ग्रामीण रुग्णालयात महीलेवर उपचार सुरू असुन आता तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय सुत्रांकडुन सांगण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.