Just another WordPress site

बारसू येथील उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या परवानगीस नकार !!

रत्नागिरी-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
राजापूर तालुक्यातील बारसू येथे प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पावरून सुरू असलेल्या संघर्षांच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज दि.६ एप्रिल शनिवार रोजी बारसूमध्ये जाहीर सभा घेण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली आहे तसेच प्रकल्पाच्या समर्थनार्थ भाजपसह विविध संघटनांनी आयोजित केलेल्या मोर्चालाही पोलिसांनी मनाई केली आहे.आता बदललेल्या कार्यक्रमानुसार उद्धव ठाकरे हे शनिवारी सकाळी १० वाजता साखरकोंभ येथे हेलिकॉप्टरने पोहोचणार आहेत तिथून ते बारसू येथील कातळशिल्पाला भेट देऊन गिरमादेवी येथे ग्रामस्थांशी संवाद साधतील त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन दुपारी ते महाडला रवाना होणार आहेत.
या प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या माती परीक्षणासाठी चालू असलेल्या ड्रिलिंगच्या कामाला स्थानिक ग्रामस्थांनी गेल्या आठवडय़ात जोरदार विरोध केल्याने आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले असले तरी पुन्हा आंदोलक बारसू परिसरात जमा होऊ लागले आहेत.या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी या परिसरात येण्याचा मनोदय व्यक्त केल्याने तणाव निर्माण होण्याची शक्यता दिसल्याने पोलिसांनी जाहीर सभेला परवानगी नाकारली आहे.उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला प्रत्युत्तर म्हणून शनिवारी प्रकल्प समर्थकांकडून शहरात मोर्चा आयोजित करण्यात आला असून या मोर्चालाही पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.यात प्रकल्पविरोधी समितीचे अध्यक्ष अमोल बोळे,पत्नी मानसी बोळे व इतर सात जणांना मनाई आदेश मोडल्याने पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.