यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
तालुक्यातील डोंगरकठोरा येथील आदिवासी आश्रम शाळेतील शिपाई कर्मचाऱ्याने आपल्या राहत्या खोलीत गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,तालुक्यातील डोंगरकठोरा येथील आदिवासी आश्रमशाळेतील शिपाई कर्मचारी नामदेव दगडू खैरनार (वय-५६) रा.वड्री ता.यावल हे सफाई कामगार म्हणून कामाला होते.नामदेव खैरनार यांनी सोमवारी ८ मे रोजी सकाळी गळफास घेवून आत्महत्या केली असून आत्महत्या करण्याचे कारण समोर आले नाही.नामदेव खैरनार हे २०१६ पासून मागील ८ वर्षापासून डोंगरकठोरा आदिवासी आश्रम शाळेमध्ये सफाई कामगार म्हणून कार्यरत होते.आज सकाळीच नामदेव खैरनार यांनी वड्री येथे राहणाऱ्या मोठ्या मुलाला फोन करून मला माझ्या लहान मुलाशी बोलायचे आहे असे बोलुन लहान मुलाशी बोलणे झाले नाही.त्यावेळी त्यांनी मोठ्या मुलाशी माझी तब्येत खराब आहे व मला भेटायला ये असे सांगितले तसेच माझ्या खिशातील चिठ्ठी वाचुन घ्यावी असे सांगीतल्याने तातडीने मुलाने घटना स्थळी धाव घेतली.दरम्यान भेटण्यासाठी मोठा मुलगा आणि सून हे आले असता त्यांच्या येण्याची आधीच त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.मयताचा मुलगा गोपाळ नामदेव खैरनार यांनी यावल पोलीस ठाण्यात खबर दिल्याने अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रकाश वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक सुनिल मोरे हे करीत आहे.सदर घटनेबाबत आदिवासी आश्रम शाळेतील मुख्याध्यापक श्री.वानखेडे सर यांच्याशी संपर्क साधला असता या घटनेबाबत व सदरील कर्मचाऱ्याने आत्महत्या का केली ? याबाबत आपण अनभिज्ञ असल्याचे सांगण्यात आले आहे.