रावेर-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
राज्यभर गाजलेल्या रावेर पंचायत समितीतील वैयक्तिक शौचालय योजनेत झालेल्या भ्रष्ट्राचार प्रकरणी तत्कालीन गटविकास अधिकारी
हबीब तडवी यांच्यासह १५ जणांचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला असल्याने आतापर्यंत ३२ संशयितांची जामिनावर सुटका करण्यात आली असून त्यांच्याकडून आतापर्यंत १ कोटी एक लाख रुपये संशयितांकडून वसुल करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,रावेर पंचायत समितीच्या वैयक्तीक शौचालय योजनेत झालेल्या भ्रष्ट्राचार प्रकरणी तत्कालीन गटविकास अधिकारी हबीब तडवी यांच्यासह १५ जणांचे नाव समोर आले होते.याबाबत रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.यावेळी संशयित आरोपींनी अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी न्यायालयात मागणी केल्याने न्यायालयाने तत्कालीन गटविकास अधिकारी हबीब तडवी यांच्यासह १५ संशयीतांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.याबाबत संशयित आरोपींकडून आतापर्यंत एक कोटी एक लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत त्यामुळे वैयक्तीक शौचालय योजनेत झालेल्या भ्रष्ट्राचार प्रकरणात अटकेतील ३३ पैकी ३२ संशयितांचे जामीन आतापर्यंत मंजूर झाले असून केवळ एक संशयीत कारागृहात असल्याची माहिती तपासाधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक यांनी दिली आहे.